Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर महापालिकेची कारवाई

गोलबाजार,अंचलेश्वर गेट,गिरनार चौक,गांधी चौक मिलन चौक,अभय टॉकीज परिसरात काढले अतिक्रमण

चांदा ब्लास्ट

शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेची कारवाई सुरूच असुन आज अंचलेश्वर गेट ते गिरनार चौक ते गांधी चौक ते मिलन चौक ते अभय टॉकीज तसेच गोलबाजार येथे फूटपाथ / नालीवरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण शहर पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय साधुन काढण्यात आले.

       शहरातील विविध भागात मनपाद्वारे अतिक्रमण निर्मुलन मोहीम मागील काही दिवसांपासुन सातत्याने सुरु असुन अंचलेश्वर गेट,गिरनार चौक,गांधी चौक, मिलन चौक,अभय टॉकीज परिसर,गोलबाजार या परिसरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढुन रस्ते मोकळे करण्यात आले आहे. फुटपाथवर केली पक्के बांधकाम,दुकानांसमोरील बांधकाम केलेले रॅम्प,कच्चे व पक्के शेड तोडण्यात आले आहे व फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

   गोलबाजारात खरेदीदारांची गर्दी असते,मात्र दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे पायी चालणाऱ्याला सुद्धा मार्ग काढणे कठीण जाते. आजच्या कारवाईत अश्या रस्त्यावर अनधिकृतरीत्या आलेल्या दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात आले. मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे ऑटोद्वारे सातत्याने देण्यात येत आहेत.

मात्र त्याकडे दुर्लक्ष करून,कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा,पोलीस विभाग व वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तसेच फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मुलन पथक,पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये