ताज्या घडामोडी

विसापूर रेल्वेगेट सुरू करण्याच्या मागणीला केराची टोपली

१० दिवसाच्या अल्टिमेटला रेल्वे विभागाला दिला खो...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर तालुक्यातील विसापुर येथे बल्लारशाह – चंद्रपूर दरम्यान मध्य रेल्वेने चौथ्या लाईनचे काम सुरू आहे. ते आता प्रगतीपथावर असून विसापूर अंडरपासचा विस्तार आणि रोडचे रुंदीकरणासाठी अंडरपास रोड तात्पुरता स्वरूपात बंद केला आहे व त्यासाठी पर्यायी मार्ग विसापूर स्मशानभूमी जवळील पुलातून दिला आहे. परंतु तो निकृष्ट दर्जाचा व पादचारी नागरिकांनसाठी अत्यंत गैरसोयीचा असल्याने रेल्वे गेट क्र. ४५ अंडरपास पूर्वरत सुरू होत पर्यंत सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे व या बाबत १० दिवसाचा अल्टिमेट रेल्वे विभागाला दिला होता. याला त्यांनी खो देत मागणीला केराची टोपली दाखवली यामुळे गावात रेल्वे प्रशासना रोष व्यक्त होत आहे.

    चौथी रेल्वे विस्तारीकरण करीता अंडरपास २ मे पासून तात्पुरता स्वरूपात बंद आहे. तो पुर्वरत सुरू होण्यासाठी जवळ पास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग दिला आहे परंतु तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून वाहन चालकांनाच त्या मार्गावरून वाहन काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तिथून पादचारी नागरिक कसे चालणार हा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवाय त्या मार्गावर रात्रीच्या वेळी हिंस्र पशुचा वावर असल्याने तिथे साध्या स्ट्रीट लाईटची सुविधा नाही यामुळे अंडरपास पुल पुर्वरत सुरू होत पर्यंत त्याच्या बाजूला असलेला रेल्वे विभागाचा जुना गेट क्र. ४५ तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता संदीप पोडे नरेंद्र ईटनकर यांनी व विसापूर गावातील नागरिकांनी रेल्वे विभागाला केली होती. परंतु दहा दिवसाचा कालावधी लोटूनही त्यावर रेल्वे विभागणी कोणतीच गंभीर दखल घेतली नाही यामुळे गावकऱ्यांना रोष निर्माण झाला आहे व कधीही यावर जन आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता यावर लवकर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे

पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट

अंडरपासचे काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. एका कंत्राटदाराने काम सोडल्याची चर्चा आहे. असेच काम सुरू राहिल्यास समोर पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होणार आहे.त्यामुळे पर्यायी मार्गातही पाणी साचणार त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होणार म्हणून रेल्वे  गेट सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता संदीप पोडे यांनी ग्रामपंचायत मार्फत रेल्वे विभागाला केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये