Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोराखेडी बावरा येथे रोजगार व व्यक्तिमत्व विकास संदर्भात मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील बोराखेडी बावरा येथे ११ मे रोजी सायंकाळी रोजगार व व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन एम टी आर एस करिअर हब व राजलक्ष्मी गृप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

यावेळी गावातील बेरोजगार तरुण तरुणींसाठी भविष्यातील नोकरीच्या संधीसाठी कशा पद्धतीने उपाययोजना करून त्यांना आवश्यक कौशल्यांचा विकास साधून रोजगार देता येईल याविषयी विस्तृत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी एम् टी आर एस एम हब व राजलक्ष्मी ग्रुपच्या प्रतिनिधींनी गावातील सर्व तरुण वर्गासोबत व नागरिकांसोबत संवाद साधला यामध्ये बोलताना सुरुवातीला प्रास्ताविकाच्या माध्यमातून सुजितजी गुप्ता यांनी तरुणांना रोजगार मिळवताना व तो मिळवल्यानंतर जी आवश्यक व्यक्तीमत्व कौशल्ये असतात याचा अभाव आपल्या भागातील सर्वसामान्य तरुणांमध्ये दिसून येतो तर ह्या कौशल्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना रोजगारासाठी अभिप्रेत गुण अंगीकृत करण्यासाठी आपण सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळवू शकता असे प्रतिपादन केले.

त्याचबरोबर एम टी आर एस करिअर हब च्या समुपदेशक अर्चना मॅडम यांनी यावेळी प्रशिक्षण कोर्सच्या प्रक्रिया पद्धती व स्वरूप स्पष्ट केले. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित असलेल्या क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी एम टी आर एस करिअर हब व राजलक्ष्मी गृप ने सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. त्याचबरोबर आजच्या आधुनिक युगात अत्यावश्यक असलेल्या संगणकीय ज्ञान,संभाषण कौशल्य,मुलाखत कौशल्य,वागणूक व वैचारिक क्षमतेतील बदलांची भासणारी गरज व एकूणच तांत्रिक दृष्ट्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी देऊळगाव राजा शहरासह तालुका व पंचक्रोषीतील समस्त तरुण तरुणींनी आपला बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी व त्यांना सक्षमपणे भविष्यातील जबाबदारी पेलता येण्यासाठी सदर प्रशिक्षण हे अत्यंत उपयुक्त आहे याचे महत्व पटवून दिले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये बोराखेडी बावरा येथील सर्व तरुणवर्ग,पालक,ग्रामस्थ यांचा समावेश होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शेरे सर,ग्रामस्थ एम टी आर एस करिअर हब व राजलक्ष्मी ग्रुपच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये