Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतात जात असताना ट्रॅक्टर चालकास कार चालक कडून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शेतात ट्रॅक्टरने जात असताना स्विफ्ट डिझायर गाडी समोर आडवी लावून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना देऊळगाव महि येथे 11मे ला दुपारी 1.30वाजता घडली आहे

सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव मही येथील रहिवासी बालाजी रावसाहेब देशमुख शेतात ट्रॅक्टरने जात असताना देऊळगाव मही येथे ट्रॅफिक जाम असता थांबले असता पाठीमागून स्विफ्ट डिझायर गाडी धडकली असता बालाजी देशमुख खाली उतरले असता कार चालकाने गाडी ट्रॅक्टर समोर आडवी लावून समोर जाण्यास अडथळा निर्माण केला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

घटनेची रिपोर्ट पोलिस ठाण्यात दिली असून कार चालक अविनाश पवार रा वाकी, त्याची पत्नी व इतर दोन इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये