ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.अभ्युदय मेघे यांचा एक फोन आणि रस्ता झाला सुरू

आकोली पुल झाला सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील आकोली या गावातील पुलाचे काम अर्धवट राहिल्याने नागरिक तसेच विद्यार्थ्यांना प्रवासासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. या प्रकरणाची माहिती मिळताच वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ.अभ्युदय मेघे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांना होत असलेल्या समस्येवर लवकरच तोडगा काढू व शासनाकडे पाठपुरावा करू अशी त्यांनी ग्वाही दिली.

त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे डेप्युटी इंजिनिअर शिंगाडे यांना फोन करून संबंधित प्रकरणाची माहिती दिली. व संबंधित विषयावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी त्यांना विनंती केली. या प्रकरणाची दखल घेत काही तासातच या ठिकाणी रोडचे काम सुरू झाले.

हा मार्ग सुरळीत झाल्यामुळे सेलू तालुक्यांतील आकोली, जामणी, मदनी, आमगाव,माळेगाव ठेका या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना सोयीचे झाले आहे. परिसरातील नागरिकांनी डॉक्टर अभिता मेघे परिसरातील नागरिकांनी डॉक्टर डॉ.अभ्युदय मेघे यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये