इलेक्ट्रिक वायरची चोरी., आरोपी अटकेत
संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्याची ची हकीकत याप्रमाणे आहे की फिर्यादी सौ तनुजा पवन चांडक रा लहरी नगर यांचे बांधकामाच्या घरून दी 19/12/2024 चे दिवसा दरम्यान दि 21/12/2024 चे रात्र दरम्यान इलेक्ट्रिक वायर कापून अंदाजे 1,50,000/रू ची चोरी केल्या बाबत फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्र 1015/2024 कलम 303(2) BNS अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना लावण्यात आलेल्या माहितीगार यांचे खात्रीशीर माहिती वरून आरोपी नामे अभिषेक सुधाकर वाघ वय 35 वर्ष रा. देशपांडे नालवाडी वर्धा यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने मला खर्चा करिता पैशाची आवश्यकता असल्याने मी लहरी नगर येथील नवीन घराचे बांधकामा वरून इलेकट्रिक वायर कापून चोरी करून, वायर जाळून त्याचे तांबे काढून विकणे करिता लपवून ठेवले आहे. असे सांगितल्या वरून त्याचे ताब्यातून 1) अंदाजे 7 किलो वजनाचे तांबे चे तार किंमत 5600/- रू 2) पाण्याची मोटर किंमत 2500/- रू 3) डीजे साऊंड चे मिक्सर किंमत 15,000/- रू 4) मोटरसायकल क्र MH 32 AM 2274 कीमत 60,000/- रू असा जुमला किंमत 83,100/रू चा माल जप्तीपत्रकावर जप्त करून सदर गुन्ह्यात आरोपी यास अटक केली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविगीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलीस स्टेशन रामनगर चे ठानेदार बिपिन इंगळे, यांचे मार्गदर्शनात बीबी पथकाचे गिरीश चंदनखेडे, अमोल राऊत, अमोल गीते, चेतन पापळे यांनी केली.