माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
सर्वोदय विद्यालयात स्नेहमिलन सोहळा, माजी, आजी शिक्षक विद्यार्थ्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
शहरातील नामांकित सर्वोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात दि.२९ डिसेंबर रोजी पार पडला. सन २००२ – २००३ वर्षीच्या दाहावी वर्गातील तब्बल २१ वर्षांनी विखुरलेले सर्व मित्र – मैत्रिणी एकत्र एकमेकांना पाहून आनंदाने भारावून गेले. यावेळी माजी विद्यार्थी, आजी,माजी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
ते म्हणतात ना, ‘एक एक कडी गुंतली की त्यांची साखळी तयार होते.’ अगदी तशीच एक साखळी या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप, फेसबुक’च्या माध्यमातून गुंतली. आणि आपल्या जीवलगांशी स्नेहभेट घडवून आणली. या भेटीला जुन्या आठवणींचा ओलावा मिळाला. ज्या शाळेला त्यांनी २१ वर्षाआधी निरोप दिला. त्याच शाळेत रविवार दि. २९ डिसेंबर रोजी हा स्नेहमिलन सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी सर्व मित्र मंडळींनी आजी, माजी शिक्षकांना बोलावून त्यांचे स्वागत करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थी जुन्या आठवणीत रमून गेले.
या अविस्मरणीय सोहळ्यात ३४ बाल मित्र, मैत्रिणींनी सहभाग घेत आपल्या बालपणीच्या आठवणी त्याच शाळेच्या आवारात जागवल्या, जिथून हे सर्वजण दुरावले होते. तिथेच पुन्हा भेटून जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत, मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी जीवनातील किस्से कहाण्यांना उजाळा दिला. हे वर्गमित्र दिवसभर गप्पागोष्टी, एकमेकांच्या हितगुजात रमले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा मानसही व्यक्त करीत जड मनाने एकमेकांना निरोप दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय कायरकर, मुख्याध्यापिका विद्या गजबे मॅडम, माजी मुख्याध्यापक साखरकर सर, चंदनखेडे सर, माजी मुख्याध्यपक रवींद्र चन्ने सर, राजेश वाटाणे कासमगोट्टूवार सर, साळवे सर, पंदिलवार सर, संजय वाटाणे, मारपल्लीवार सर, खरतळ मॅडम, कुंदा कवलकर मॅडम, ईतर आजी, माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.