Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दारूबंदी काय‌द्यान्व्ये कारवाई

एकूण १ लाख ३१ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 28.12.2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन, भा.पो.से. यांनी जुने वर्ष संपण्याचे पर्व व नुतन वर्षाचे अनुषंगाने जिल्हयात नागरिक वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी नुतन वर्षाचे उत्सव साजरे करतात. त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आदेशान्वये विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकास विशेष सुचना व निर्देशााप्रमाणे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये विशेष मोहिम राबविण्यास आदेशीत करण्यात आले. त्या अनषंगाने श्रीमती प्रतिक्षा खेतमाळीस, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांचे नियंत्रणात एक विशेष पथक तयार करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील आर्वी नाका झोपडपट्टी परिसरात विशेष मोहिम राबविण्यात आली.

सदर मोहिमे दरम्यान वर्धा शहर परिसरातील आर्वी नाका झोपडपट्टी येथे मा. पोलीस अधीक्षक साहेब, वर्धा यांचे निर्देशानुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोहिम राबवून एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकूण 12 आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर मोहिमे दरम्यान देशी विदेशी अवैध दारू साठा एकूण किंमत 1,31,120 रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पथक प्रमुख श्रीमती प्रतिक्षा खेतमाळीस, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांचे प्रत्यक्ष हजेरीत सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र रेवतकर, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कार्यालयीन स्टाफ, आर.सी.पी. पथक व पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील स्टाफ यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये