रेती तस्करांनी तपाळघाटावरून केली हजारो ब्रास रेतीची चोरी
रेती तस्करांनी नदीचा एक ते दोन किलोमीटर परिसर पोखरला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील घाटाचा लिलाव झाला नसतानाही तालुक्यातील नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील फक्त तपाळ रेती घाटाचा विचार केल्यास या घाटातून एक ते दोन किलोमीटर नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचा अवैध उत्खनन केल्याचे दिसून येत असून यातून शासनाचा मोठा महसूल बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.घाटातून एव्हढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा होऊन वाहतूक सुरू असतानाही या बाबीकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असल्याने रेती तस्करी मध्ये काही महसूल कर्मचारी सोबत मोठे अधिकारीही सहभागी असल्याचे खळबळजनक वृत आहे.
ब्रम्हपुरी तालुका जसा शिक्षण, आरोग्य क्षेत्रात नावाजलेला आहे तसेच तालुक्याला लाभलेला वैनगंगा नदी किनाऱ्या मुडे उपलब्ध होत असलेल्या रेती करता सुद्धा प्रसिद्ध आहे।ब्रम्हपुरी तालुक्याला वैनगंगा नदीचा 50 किलोमीटर चा किनारा लाभला असून तालुक्याच्या सीमेला लागून वाहणाऱ्या या नदी काठावर जवळपास 28 रेती घाट आहेत. नदीमध्ये उत्तम दर्जाचे रेती उपलब्ध असून आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठी मागणी आहे. उत्तम दर्जाची रेती व मागणी लक्षात घेता रेती तस्करांनी मागील अनेक वर्षांपासून नदीला पोखरून नदीचा पाण्याचा प्रवाह बदलून टाकल्याचे चित्र आहे.
नुकतेच 30 नोव्हेंबरला तोरगाव( बु)परिसरात महसूल विभागाने कारवाई करत वन विभागाच्या जागेतून 130 ब्रास रेती जप्त केली.सदरच्या कारवाही मुदे तालुक्यात अवैध रेतीचा साठा व वाहतूक सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे.अवैध रेती साठा वर महसूल विभागाची कार्यवाही होऊन एक महिन्याचा कालावधी लोटून सुध्दा महसूल प्रशासना ला त्या अवैध रेती तस्कर कोण याची माहिती नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ज्या महसूल कर्मचारी च्या भागात हा रेती साठा सापडला त्याच्यावर सुध्दा महसूल प्रशासन तर्फे अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
तपाळ नदी पात्रातून एव्हढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उत्खनन होत असून सुद्धा ब्रम्हपुरी महसूल विभागाला याचा पत्ता लागत नसल्याने अनेक तर्क लावले जात आहे.तालुक्यातील नदी पात्रातून सुरू असलेले अवैध रेती तस्करीला मोठे राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रशासन सुध्दा बघ्याची भुमिका घेत असल्याचे बोलले जाते.तालुक्यात सुरू असलेले रेती तस्करीत राजकीय शेत्रातील अनेक दिग्गजांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे.अवैध रेती उत्खनन प्रकरणात स्थानिक पातळीवरून योग्य ती कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
बॉक्स:
आमच्या प्रतिनिधीने तपाळ रेती नदी घाट परिसरात जाऊन पाहणी केली असता सदर रेती घाटावर दीड ते दोन किलोमीटर नदीपात्र परिसरात हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याचे दिसून आले.तपाळ गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नांन्होरी रस्त्याच्या बाजूला अवैध रेतीचा साठा दिसून आला तसेच या ठिकाणावरून ट्रॅक्टर चे माध्यमातून वाहतूक सुरू असल्याचे दिसले.तालुक्यात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा व वाहतूक सुरू असताना तालुक्यात अवैध रेतीचे फक्त एक दोन ट्रॅक्टर, टीप्परवर कार्यवाही करून महसूल विभाग स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेताना दिसून येत आहे.महसूल प्रशासन आपली पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असताना दुसरीकडे तालुक्यातील अवैध रेती चोरी जैसे थे असल्याचे दिसत आहे.