वडगाव येथील रासेयोच्या विशेष शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वडगाव येथे रासेयो च्या विशेष शिबिरात विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या स्मिताताई चिताडे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पुढे सामाजिक प्रगति साधावी असे आवाहन केले तर ग्रामीण विकासासाठी युवकांचे योगदान या विषयावर महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य तथा रासेयोचे माजी जिल्हा समनवयक प्रा विजय आकनुरवार यांनी विद्यार्थ्यांनी गावातील विविध प्रश्न समजून घावे व त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढे यावे व गावाचा विकास साधावा असे आव्हान केले.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांचे ही मोलाचे मार्गदर्शन झाले या वेळी कार्यक्रमाला रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा प्रदिप परसुटकर,सेवानिवृत्त शिक्षक भोंगळे गुरुजी, प्रा आशिष देरकर,प्रा सुधीर थिपे,प्रा प्रशांत पवार,प्रा संगीता पुरी व रासेयोचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.