ताज्या घडामोडी

चंदनखेडा येथील तंमुसच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमीयुगुल विवाहबद्ध

दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

अतुल कोल्हे भद्रावती

तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने गावातील राहुल गोपिचंद कांबळे (२६) व फिश मार्केट जवळ बिनबा वार्ड चंद्रपूर येथिल आरती रविंद्र वानखेडे (२८) ह्यांनी लग्न लावून देण्यासाठी केलेल्या विनंती अर्जावर सकारात्मक निर्णय घेऊन प्रेमी युगुलाला विवाहबंधनात बांधुन आदर्श निर्माण केला.

प्राप्त माहितीनुसार दिनांक ०८ मे २०२४ रोजी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर हनवते यांनी दोन्ही प्रेमी युगुलांची कागदपत्रे तपासून दोघेही सज्ञान असल्याची खात्री करून घेतली तसेच मुलीच्या घरच्यांचे समुपदेशन करून मुलीचे आई वडील व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले. समितीने घेतलेल्या पुढाकाराने समाधानी झालेली वधु पक्षाची मंडळींनीही ९ मे २०२४ ला. सायंकाळी ७.४५ ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चंदनखेडा येथे लग्नाला उपस्थित राहुन वधु वराला आशिर्वाद दिल्याने नवदाम्पत्याचा आनंद द्विगुणित करण्यात तंटामुक्त समितीला यश आले. दोन्ही प्रेमी जीवांनी त्यांचे भावी आयुष्य सुख समाधानाने व्यतीत करावे अशा शुभेच्छा मुलीच्या आई वडीलांन कडुन देण्यात आल्या.

यावेळी मुलीचे वडिल रविंद्र वानखेडे, आई राधाबाई वानखेडे, मुलाची आई कासाबाई गोहणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, सामाजिक कार्यकर्ते सिंगलदिप पेंदाम, शाहरुख पठाण, प्रभाकर दोडके, दिलिप कुळसंगे, सुशिला हनवते, गंगुबाई शेरकुरे, सोनाबाई खडसंग, पोलिस पाटील समिरखान पठाण, तंटामुक्त समिती सदस्य छाया घुगरे, मनोहर घुघरे, बशीर शेख, मिलिंद पांढरे, लोकेश कोकुडे, अमृता कोकुळे, सोनाली मुडेवार, मनिषा बारस्कर, सविता सोनुले, सुनंदा गेडाम, कविता गोहणे, मंगला वाटेकर, ज्योती बाटबरवे, छाया सोनुले, दिवाकर गोहणे, होमराज घुमे, राजु वझे, दिनेश कोकुडे, मंगेश हनवते, राकेश सोनुले, शंकर दडमल, देवानंद दोडके, अनिकेत बुरेवार, अमोल महागमकार, बालाजी महागमकार, अशोक पोहीनकर, गोरक्षनाथ गोहणे, चरणदास बागेसर, वसंत नन्नावरे, देवानंद पांढरे, सुरज भोयर, राहुल कोसुरकार, दिलिप ठावरी, आशिष हनवते ज्यांचेसह गावातील मान्यवर उपस्थित होते. आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये