ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरूषांच्या कबड्डी सामन्यांचा हंसराज अहीर यांचे हस्ते समारोप

माजी खासदार चषकाचा मानकरी वणीचा संघर्ष क्रिडा मंडळ तर उपविजेता संघ चंद्रपूरचा साईबाबा क्रिडा मंडळ

चांदा ब्लास्ट

सतशिल बहुउद्देशिय व्यायाम प्रसारक मंडळ चंद्रपूर व सन्मित्र कीडा मंडळ चंद्रपूर च्या वतिने दि. १६ ते १८ फेब्रुवारीपर्यंत आयोजित ‘माजी खासदार चषक’ पुरूषांचे भव्य खुले कबड्डी सामन्यांचा समारोप राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडला.

या समारोपिय कार्यक्रमास भाजपा नेते विजय राऊत माजी महापौर अंजलीताई घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, माजी सभापती रविंद्र गुरूनुले माजी नगर सेवक सुभाष कासनगोटूवार, राजू घरोटे, विठ्ठलराव डूकरे, विशाल निंबाळकर, यश बांगळे, संगीता खांडेकर, पुनम तिवारी, सागर वानखेडे, राहूल देवतळे, विनोद शेरकी, राजेंद्र अडपेवार, किशोर कुडे, जिल्हा कबड्डी असो. चे अध्यक्ष शिवा कुमरवार, सचिव प्रशांत करडभाजने, रविंद्र शेरकी, महेंद्र शेरकी, अमित लडके, महेंद्र व्याहाडकर, प्रमोद डाखोरे, गणेश काळे, भारत रोहणे, सुधाकर बुटले, नरेंद्र निंबाळकर, सचिन ठाकरे आदिंची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या सामन्यात अ. गट ७० किलो, वजन गटातील विजेत्या संघर्ष कीडा मंडळ वणी व साईबाबा बहुउद्देशीय कीडा मंडळ चंद्रपूर च्या चमुला अनुक्रमे रघुवीर अहीर यांच्या तर्फे आकर्षक चषक व रोख ३१ हजार रूपयांचे तर उपविजेत्या चमुस शामल अहीर यांचे द्वारा पुरस्कृत २१ हजार रूपयांचे रोख पारितोषिक व चषक देवून हंसराज अहीर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. ५५ किलो वजनी व गटातील विजेती चमू जय जगन्नाथ कीडा मंडळ कोंढा व उपविजेत्ता राजीव कीडा मंडळ दुर्गापूर या चमुस चंदन अहीर यांच्यातर्फे पुरस्कृत अनुक्रमे २१ हजार रोख व आकर्षक चषक तसेच उपविजेता संघास विनय अहीर व हर्षवर्धन अहीर यांच्यातर्फे पुरस्कृत रूपये १५ हजार रोख व चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या वेळी दोन्ही गटांना व विजेत्या चमुंना वैयक्तिक बक्षिसे

मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.

या कबड्डी सामन्यांच्या यशस्वीते करीता कपिल शिवनकर, मोहन लडके, मोहन चौधरी, दशरथ धोबे, पंकज हुड, संभा खेवले, भारत रोहने, सचिन चापले, मंगेश वाघाडे, मिलिंद वाघाडे, समिर चापले, प्रणय डंभारे, प्रमोद डंभारे, जयंद्र शेरकी, चंद्रशेखर शेरकी, घनश्याम डंभार, तुकेश एकोणकर, राम लांडगे, सौरभ काळे, चेतन शिवनकर, हंसराज शेरकी, ऑम लडके, संकेत वाढरे, साई ठाकरे, गणेश कुडे, सुमित मालुसरे, तेजस काळे, प्रेम राऊत, चिराग मामिडवार, अभिजित चौधरी, मेघनाथ चौधरी, लक्की रोहणकर, अमर धोटे, सार्थक कोहपरे यांचेसह अनेकांनी परिश्रम घेतले. या सामन्याला तिन्ही दिवस प्रेक्षकांची अपार गर्दा लाभली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये