मा. रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य प्रशंसनीय

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी बांधवासाठी व बचतगटातील महिलांसाठी अतिशय चांगले काम करीत आहे. पाड्यावरची आदिवासी महीला बचतगटाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आली पाहिजे गोर-गरीब शेतकरी बांधवाचा विकास झाला पाहिजे आदिवासी विकास विभागाकडे अनेक योजना आहेत. ते बँकेमार्फत राबवा निधी कमी पडू देणार नाही या जिल्हातील गोर-गरीब बचतगटातील महिलांचा व शेतकरी बांधवांचा कायापालट बँकच करू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे श्री. रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री मा.ना श्री.डॉ. अशोक उईके यांनी दि.२६.०९.२०२५ रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
बँकेचे अध्यक्ष मा.श्री. रविंद्र शिंदे यांनी बँकेमार्फत सुरु असलेल्या शेतकरी बांधव व बचत गटासाठीच्या योजनांची माहिती दिली. आज बँकेकडे २७६२६ बचतगट असून १९५८९ चालू बचतगट व ५१२३ बचत गटांना रु.१३४ कोटी ४२ लाख कर्ज वाटप केले. ३१ मार्च २०२६ पर्यंत १६० कोटी बचतगटांना कर्ज वाटप करण्याचा मानस असल्याचे बँकेचे अध्यक्ष मा.श्री. रविंद्र शिंदे यांनी सांगितले.
तसेच बँकेच्या वतीने सुरु करण्यात येणारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कल्याण निधी योजना आणी शेतकरी बांधवासाठी थकीत पिक कर्जाकरिता “एक रकमी कर्ज परतफेड योजना” सुरु करणारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील हि पहिली बँक आहे असे बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात १) गोंडवाना महिला बचतगट दुर्गापूर रु. ५ लाख २) लुंबीनी महिला बचत गट वडगाव रु.५ लाख ३) महालक्ष्मी महिला बचत गट महाकाली वार्ड रु. ५ लाख, ४) रमाबाई महिला बचत गट दाताळा रु ५ लाख, ५) करुणा महिला बचत गट-दाताळा रु.५ लाख ६) लक्ष्मी महिला बचत गट महाकाली वार्ड रु ३ लाख ७) शुभलक्ष्मी महिला बचत गट महाकाली वार्ड ५ लाख असे एकूण ७ महिला बचत गटांना रु. ३३ लाख कर्ज वाटप करण्यात आले.
या प्रसंगी चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. किर्तीकुमार भांगडिया चंद्रपूर विधानसभेचे आमदार मा. श्री. किशोर जोरगेवार भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष कासनगोटूवार ओबीसी चळवळीचे नेते श्री. अशोक जीवतोडे आणि इतर कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाला बँकेचे संचालक सर्व श्री. सुदर्शन निमकर, विजय बावणे, उल्हासराव करपे, निशिकांत बोरकर, जयंत टेमुर्डे, दिनेश चोखारे, ललित मोटघरे, रोहित बोम्मावार, गणेश तर्वेकर, आवेशखान पठाण, बँकेचे संचालिका सौ. नंदाताई अल्लूरवार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर भि. कल्याणकर यांची उपस्थिती होती.
बँकेचे संचालक आवेशखान पठाण यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला व सर्वांनी त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री. राज दर्वे यांनी केले. शेतकरी बांधव बचतगटातील महिला बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.