वर्धा जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीकडून NEET परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : देशभर गाजत असलेल्या NEET-UG परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी (BSP) वर्धा जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दि. 18 मे 2026 रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात NEET परीक्षेतील पेपर लीक, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या प्रकारांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, अशा प्रकारच्या पेपर लीक प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढत असून त्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये या घोटाळ्याचे धागेदोरे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
बहुजन समाज पार्टीने या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने घेण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही BSP च्या वतीने देण्यात आला.
या निवेदनावर प्रदेश महासचिव मा.dr.मोहन राइकवार सर लोकसभा इन्चार्ज प्रज्ञा ताई दुपट्टे अनोमदर्शी भैसारे जिल्हाध्यक्ष वर्धा तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्तिथीत निवेदन देण्यात आले.



