ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर बस स्टॅन्ड परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठा जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

      बल्लारपूर पोलीस जुगार रेड कामा करिता पेट्रोलिंग करीत असतांना खबरी कडून माहिती मिळाली बल्लारपूर बस स्टॅन्ड वर प्लास्टिक चा चुगळीत काही तरी अवैध माल असल्याचा संशय व्यक्त केला त्या आधारे पोलिसांनी तिथे जाऊन तपासनि केली असता त्या बोरी मध्ये सुगंधित तंबाखू ने भरलेले सिल्वर कलर चे पॅकेट होते.पोलिसांनी सर्व बोरी जप्त करून पोलीस स्टेशन ला आणण्यात आले.

तिथे सर्व बोरी तपासले असता त्यात सिल्वर कलर चे 100नग प्रत्येकी पॅकेट मध्ये 3किलो तांबाखू असे 300 किलो ग्रा. प्रत्येकी की,1500असे 4लाख 50हजार चा सुगंधित तंबाखू जप्त करून आरोपी राजेश नरसाय्या अंबाला रा, दादाभाई नौरोजी वॉर्ड बल्लारपूर,जी, चंद्रपूर.यांचावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली.आरोपी कुरियर चे कामं करीत असल्याचे कळते. ही कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, sdpo दीपक साखरे,राजुरा. यांचा मार्गदर्शनातं बल्लारपूर पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कंक्रेडवार, सफौं, गजानन डोईफोडे,रणवीजय ठाकूर,संतोष दंडेवार,सत्यवान कोटनाके,वशिष्ट रंगारी, श्रीनिवास वाभीटकर, इतर पोलीस स्टॉफ ने केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये