ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी चालक-वाहकचा प्रामाणिकपणा, ४० हजार रुपयांनी भरलेली बॅग प्रवाशाला परत

ब्रम्हपुरी येथील चालक व वाहक यांचा प्रामाणिकपणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी एसटी बसचे चालक अजय खुळसिंगे आणि वाहक गोकुळ सहारे यांनी प्रामाणिकता दाखवत प्रवाशाची पैशांनी भरलेली बॅग परत केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उमरखेड वरून ही एसटी बस हे दोघेही घेवून जात होते. बुधवारी ही बस उमरखेड डेपोहून सकाळी सुटली. त्यानंतर प्रवासी चढल्यानंतर बसने पुढील मार्गक्रमण केले. यामध्ये एक तरुण सिंदेवाही वरुन ब्रम्हपुरी येथे जाण्यासाठी निघाला होता. त्याची चाळीस हजार रुपये असलेली बॅग तो बसमध्येच विसरला स्वतःच्या नादात तो ब्रम्हपुरी येथे ही बॅग एसटी बस मध्येच विसरुन उतरला. एसटी बस ब्रम्हपुरी बस डेपोत पोहोचली.

डेपोत पोहोचल्यानंतर चालक अजय खुलसिंगे आणि वाहक गोकुळ साहारे यांनी एसटी चेक केली असता त्यांना बस मध्ये एक बॅग आढळली लगेच त्यांनी ती बॅग T I मॅडम पुजा यांचे समोर चेक केली असता त्या बॅग मधे ४०हजार रु असल्याचे आढळून आले

सदर युवक बस डेपो मध्ये आल्यावर त्याने चौकशी केली असता त्याला ती बॅग परत करण्यात आली युवक हा त्याची आई एका खाजगी दवाखान्यात भर्ती असल्याने तो पैसे घेऊन येत होता.

ब्रम्हपुरी डेपोच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या दोघांचे अभिनंदन केले. कर्तव्य दक्षता आणि प्रामाणिकपणा दाखवून प्रवाशाची बॅग परत केल्यामुळे चालक वाहकाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये