Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- १ मे २०२४ रोजी वैभव कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूर येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष हेमंत मानकर यांचे हस्ते झाले.

       या वेळी संस्थेचे सचिव व संस्थापिका रजिया खान, संचालिका सुरेखा पांडे (मिश्रा), मुख्याध्यापक विजय शिंदे , शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. फरजाना शेख , सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

  या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र गीत गायले गेले.शाळेच्या संचालिका सुरेखा मिश्रा (पांडेय) यांनी सर्वांना प्रेरित करून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक विजय शिंदे यांनी आपले विचार मांडताना महाराष्ट्र दिन व कामगारांच्या हक्काविषयी माहिती दिली. शिक्षिका ज्योती बजगोती यांनी महाराष्ट्र दिनासंदर्भात भाषण दिले. शिक्षिका शिल्पा देशभ्रतार मॅडम यांनी कामगारांचे कार्य व त्यांना मिळालेले अधिकार याबाबत विचार मांडले.

  कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका नम्रता मोडक आणि आभार शिक्षिका उषा तुरणकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये