ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे महाराष्ट्र दिन साजरा

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या दिनाचे औचित्य साधून शाळेत सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी महाराष्ट्राचे राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गायले. या प्रसंगी शिक्षिका रोशना हजारे यांनी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्त्व विशद केले.

समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमीका नेहमीच महत्त्वपूर्ण असते. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून शाळेतील बस चालक-वाहक, ताई तसेच इतर सहाय्यक कर्मचा-यांकरिता विशिष्ट खेळांचे आयोजन करण्यात आले.

मुख्य अतिथी प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व आंतराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जपत आपल्या पिढीने साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान क्षेत्रात उत्तंुग भरारी घेत नवनवी शिखरे गाठावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेवती बडकेलवार तर आभार प्रदर्शन मनिषा नागोशे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख रोशना हजारे, प्रांजली गोवारदिपे, फहीम शेख, रूहीना तबस्सुम तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये