ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबेझरी येथील शिक्षक बंडू राठोड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पंचायत समिती, जिवती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबेझरी, येथील विषय शिक्षक श्री.बंडू राठोड, यांना जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षक दिनी गौरविण्यात आले.जिल्हा परिषदेच्या मा.सा.कन्नमवार सभागृहात हा गौरव सोहळा पार पडला.विषय शिक्षक बंडू राठोड व चंद्रकला राठोड यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विवेक जाॅन्सन व आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार,मा.राजकुमार हिवरे शिक्षणाधिकारी प्राथमिक,मा.सौ.कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक,व इतर सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

बंडू राठोड गेल्या २६वर्षापासून कार्यरत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचा नेहमीचा प्रयत्न राहिला आहे त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.विविध स्पर्धा आयोजित केल्या, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा तयारी,गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा, डिजिटल लायब्ररी बनवली, शालेय बचत बँक, योग्य असे वाचनालय बनविले, असे अनेक उपक्रम राबविले आहे.

त्यामुळेच विद्यार्थी प्रिय असलेले जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबेझरी येथील विषय शिक्षक यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेतर्फे जिवती तालुक्यातून त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले.या कौतुकास्पद कार्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये