ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलेला जिवाने मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो स्टे सेलू जि वर्धा येथे दाखल फिर्यादीनुसार आरोपी सुभाष महादेव सरवरे रा. सालई (पेक्ट) ता. सेलू जि. वर्धा याने ललीता भास्कर सरवरे, वय 40 वर्ष राहणार सालई (पेक्ट) जि. वर्धा यांस जुन्या वादाच्या कारणांवरुन गंभीर मारहाण करुन जखमी केल्याने रिपोर्ट फिर्यादी कु. मिनल भास्कर सरवरे, वय 20 वर्ष रा. सालई (पेक्ट), ता. रोलू जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन सेलु जि वर्धा येथे दिली होती.

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी कु. मिनल भास्कर सरवरे, हिचे मोठे वडील सुभाष महादेव सरवरे तिच्या आजिकडे आले व तिच्या आजिला श्रीमती कलावती महादेव सरवरे हिला म्हणाले की, तु माझाकडे राहत होती, तुला मझाकडे रहायला काय झाले, तु माझाकडे राहायला चल तेव्हा माझा आजीने मी येत नाही इतेच राहते असे म्हटले तेवडयात माझी आई भांडी धुण्याकरीता बसली असता माझी आजी माझा आईला काहीतरी बोलु लागली व मोठे वडीलांला सांगत होती तेव्हा माझे मोठे वडीलांनी सुभाष महादेव सरवरे यांनी माझे आईला उचलुन भांडयावरती खाली जमिनीवर पाडले तेव्हा तिच्या तोडातुन रक्त निघाले त्यानंतर आई ओरडली तसेच माझे मोठे वडीलांनी सुभाष महादेव सरवरे यांनी इंधनामध्ये पडून असलेली (डेळ) काठी हातात घेवुन माझे आईच्या डोक्यावर, मानेच्या वर व पाठीवर ताकतीने मारून गंभिर जख्मी केले तसेच आमचे गावचे पोलीस पाटील विनोद घाटोले हे आईला वाचविण्याकरीता धावले असता त्यांचे डोक्यवर मारण्यास काठी उगारली. फिर्यादी कु. मिनल भास्कर सरवरे, वय 20 वर्ष रा. सालई (पेवट), ता. सेलू जि. वर्धा अशी तक्रार दिल्यामुळे आरोपी विरुध्द, अप.क. 150/2020 अन्यये 307,326,324 भा.द.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, आरोपी विरुध्द चौकशी अंति भरपुर व सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.

वर्धा येथील मा. तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्रीमती आर. जे रॉय यांचे न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजुन एकुण 15 साक्षदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षाने दिलेला पुरावा आणि केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मा. तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्रा न्यायाधिश श्रीमती आर. जे. रॉय यांनी आरोपी सुभाष महादेव सरवरे यांना कलम 307 भा. द. वि. मध्ये 10 वर्ष कारावास तसेच रु. 5000/- रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिन्याचा सश्रम कारावास आणि कलम 324 भा. द. वि. मध्ये 6 महिने कारावास तसेच रु. 1000/- रुपये दंड भरल्याय 01 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षाच्या बाजुने श्रीमती, व्हि. आर. पटील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, वर्धा यांनी सदर प्रकरणात साक्षीदारांचे बयाण आणि मौल्यवान युक्तिवाद केला. तसेच पो. उप. निरिक्षक सौरभ घरडे यांनी प्रकरणाचा मौल्यवान तपास केला आणि कोर्ट पैरवी श्री संजय चावके, सहायक फौजदार पो. स्टे. सेलु यांनी साक्षीदारांना न्यायालयांत हजर करुन मोलाची कामगिरी बजावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये