Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न हेच सावित्रीबाईं फुलेंना अभिवादन – प्रवीण गिते 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

उपेक्षित, वंचित घटक तसेच महिलांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्न करीत राहणे हेच खरे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे मराठी विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित अतिथी व्याख्यान प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विचारपीठावर राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे उपस्थित होते.

सावित्रीबाईं व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रवीण गीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या पीढीने महापुरुषांना केवळ अभिवादन करू नये तर त्यांच्या विचारांचे अवलोकन करावे असे आवाहन केले. एकूणच समाजाची विस्कटत चाललेली घडी व्यवस्थित करण्याची जबाबदारी आता युवा पिढीवर आहे असे मत सुद्धा गीते यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी महिलांची प्रगती ही खऱ्या अर्थाने देशाची प्रगती ठरेल, असे प्रतिपादन केले. देशाच्या लोकसंख्येत निम्मा हिस्सा असणाऱ्या स्त्रिशक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य व संधी दिल्यास भारताला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. तसेच जात, धर्म, लिंग, इत्यादी बाबींवर आधारित भेदभाव संपुष्टात आणणे हीच, सावित्रिमाईंना खरी आदांजली ठरेल असे, असे मत प्राचार्य डॉ. गोरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंजुषा मुळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंतर्गत तक्रार निवारण समिती समन्वयक डॉ. ज्योती ढोकले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये