ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे श्रीराम नवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील माळी पुरा मध्ये असलेल्या श्रीराम मंदिर येथे श्री राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सायंकाळी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

प्रभु श्रीराम ची भव्य प्रतिमा तसेच टॅक्टर वर विराजमान आकर्षक वेशभूषेतील बालके, तसेच पुरुष सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. डिजे च्या तालावर नाचत जय श्री रामच्या घोषणांनी तसेच प्रचंड आतिषबाजी ने परिसर दणाणून गेला, बालाजी मंदिर समोर श्रीराम ची आरती करण्यात आली, शोभायात्रेत रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत चौंडेश्वरी मंदिर येथे पोहचल्यानंतर विसर्जित कऱण्यात आली.

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले जातीने हजर होते.श्री राम जन्म उत्सव यशस्वी करण्यासाठी उत्सव समिती चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये