ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदुर येथे ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तथा राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. संबंधित कार्यशाळा आयोजित करण्याकरिता राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर द्वारा विशेष सहकार्य मिळाले.

कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शैलेंद्र देव यांच्या सूचनानुसार डॉक्टर उत्कर्ष मून, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्याद्वारे करण्यात आले. डॉक्टर शैलेंद्र देव यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये पेटंट्स आणि कॉपीराइट्स चे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी यांचे कार्यशाळा आयोजित करण्याकरता विशेष योगदान मिळाले. सदर कार्यशाळेला जवळपास 300 विद्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदणी केली आणि सहभाग घेतला.

राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट या संस्थेतील तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर कुमार राजू यांनी उपस्थित सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संदीप घोडिले यांनी आभार प्रदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये