वर्धा पोलीस वेलफेअर असोशियन द्वारा साह्य निधी करीता स्वर तरंग कार्यक्रम साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 22 मार्च 2025 रोजी वर्धा जिल्ह्यात वर्धा पोलीस कल्याण निधी अंतर्गत स्वरतरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री नामदार डॉ. पंकजजी भोयर प्रमुख अतिथी तथा विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ नागपूर परिक्षेत्र नागपूर.हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर जी कुनावार वर्धा जिल्हाचे माजी खासदार रामदासजी तडस देवळी पुलगाव मतदार संघाचे आमदार राजेश जी बकाने वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कुमार कवडे सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुलजी चव्हाण व संपूर्ण वर्धा जिल्हातील अधिकारी वर्ग व संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले असून वर्धा पोलीस खात्याला मिळालेल्या सात बोलेरो गाड्यांचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले वीस दिवसांमध्ये हा कार्यक्रम नियोजन करण्याच्या मागे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांचे खूप मोठे श्रेय मिळाले असून यावेळी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुरागजी जैन यांनी पालकमंत्री यांचं आभार मानलेले आहेत
स्वरतरंग कार्यक्रमाचे सुरुवात देवता ढोल पथक पासून सुरुवात झाली मराठी हास्य कलाकार व टीम धमाल गणेश पुरे लावणी कैलाश खेर आणि बँड कैलाश यांच्या 101 गाण्याचे परफॉर्म सुर झाले प्रेक्षकांनी स्वर तरंगाचा आनंद व्यक्त केला….