ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदान करणाऱ्यांना मिळणार आझाद बगीच्यात मोफत प्रवेश

मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास मनपाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा

चांदा ब्लास्ट

लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.या मतदानात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असुन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील,ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना १९ व २० एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार आहे

      १३ – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न प्रशासनामार्फत केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.या मतदार चिठ्ठीद्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.

    या वाटपादरम्यान जर काही नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल तर त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करता येईल किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये,नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर ( Epic Number ) टाकून माहिती करून घेता येईल. त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर जावून माहिती करून घेता येईल किंवा चंद्रपूर

महानगरपालिकेच्या १८००१२३७९८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून मतदार चिठ्ठीबाबत माहिती घेता येईल.

   तेव्हा सर्व नागरिकांनी १९ एप्रिल रोजी मतदान करून जागरूक नागरिकाचा हक्क बजावण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये