ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रामनवमीच्या भव्य शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे

विविध कलाकृती व झाकीचे आयोजन ; विविध संस्थेतर्फे महाप्रसादाचे वितरण

चांदा ब्लास्ट

मागील ४६ वर्षापासून श्रीरामनवमीनिमित्त चंद्रपुरात ऐतिहासिक काळाराम मंदिर समाधी वार्ड चंद्रपूर येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी श्रीरामनवमीनिमित्त श्री काळाराम मंदिर देवस्थान व शोभायात्रा समिती तर्फे चंद्रपूर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यात हिंदू समाजातील विविध जाती, पंथ, संप्रदाय तथा सामाजिक संस्था, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, भजन मंडळी, व्यापारी प्रतिष्ठान सहभागी होत असून विविध कलाकृती व झाकीचे आयोजन करण्यात आले आहे.

     तसेच शोभायात्राच्या महामार्गावर विविध संस्थेतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी अग्र पूजेचा मान बंजारा समाजाला मागील अनेक वर्षापासून रामनवमीनिमित्त सामाजिक समरसतेचा प्रदर्शन शोभायात्रेत होत असून याही वर्षी ती परंपरा श्री काळाराम मंदिर देवस्थान व शोभायात्रा समितीने कायम ठेवली आहे.

यावर्षी शोभायात्राच्या पूर्वी आद्य पूजेचा मान चंद्रपूर जिल्ह्यातील बंजारा   समाजाला देण्यात आला आहे. बंजारा समाजाचे नायक श्री वसंतराव राठोड हे सपत्नीक आपल्या सहकाऱ्यांसह श्री काळाराम मंदिर येथे येऊन विधिवत प्रभू रामाची पूजा करेल व त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल.. याप्रसंगी बंजारा समाजातर्फे माजी सभापती पंकजजी पवार, प्राध्यापक विश्वनाथ राठोड, माजी शिक्षणाधिकारी रामरावजी पवार तथा मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे समाज बांधव आपल्या पारंपरिक वेशेत सहभागी होणार आहे.

यापूर्वी सुदर्शन समाजातर्फे सुरू झालेल्या अग्र पूजेचा मान कार्यात वाल्मिकी समाज, चर्मकार समाज, जैन समाज, गोंड समाज, मातंग समाज, मादगी समाज, सुतार समाज, धोबी समाज, बुरड समाज, तेलगू शिंपी समाज, धनगर समाज, कैकाडी समाज, गवळी समाज, खाटीक समाज, कुंभार समाज , भोई समाज इत्यादी समाज बांधवांना मिळाला आहे.

 ही सामाजिक समरसतेची परंपरा अशीच पुढे कायम ठेवण्याचा व समाजात एकात्मता व एकोपा निर्माण करण्याचा शोभायात्रा समितीचा उद्देश आहे. श्रीराम नवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन श्री काळाराम मंदिर देवस्थानाचे विश्वस्त माननीय श्री  विजय दोमलवार, सौ वैभवी विजय दोमलवार, रमेशचंद्रजी बागला, ,वसंत थोटे, विवेक आंबेकर मन्ना महाराज त्रिवेदी, प्राध्यापक श्याम धोपटे, सुमेध कोतपल्लीवार, मिलिंद गंपावर, अजय वैरागडे, आशिष जोशी, संजयराव कुलकर्णी, दामोदर मंत्री, डॉक्टर महावीर सोईतकर, घनश्यामजी दरबार, पंकज अग्रवाल, गणपत सत्रे,  दीपक बेले, निलेश चोरे,  अजय जयस्वाल, राजेंद्र गांधी, अर्णव दोमलवार तथा श्री काळाराम मंदिर देवस्थान तर्फे करण्यात येत आहे.

विवेक आंबेकर चंद्रपूर.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये