ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गंगूबाई उर्फ अम्माच्या हस्ते अम्मा की दुकानचे उद्घाटन

निराधार गरजू महिलांना मिळणार अम्मा की दुकान, आमदार किशोर जोरगेवार यांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

निराधार गरजु महिलांना स्वयंरोजगारातुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा की दुकान हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत बंगाली कॅम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला अम्मा का दुकान उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

  सदर दुकानाचे गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमख कौसर खान, आशा देशमूख, विमल कातकर, शमा काजी, निलिमा वनकर, अनिता झाडे आदिंची उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यभर चर्चीला जात आहे. सदर उपक्रमा अंतर्गत गरजवंताच्या घरी दररोज जेवणाचा टिफिन पोहचविला जात आहे. दरम्यान आता त्यांच्या संकल्पनेतून स्व. प्रभाताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अम्मा कि दुकान हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

निराधार महिला आणि दिव्यांग बांधवांन समोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वताचा रोजगार सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्याकडे नसल्याने त्यांच्या पुढे मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे दुस-यांकडे अल्पश्या वेतनात काम करण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. ही बाब लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम सुरु करण्यात आला असून स्वयंरोजगारातुन समाजातील या घटकाला आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. विशेष म्हणजे. अम्मा स्वता फुटपाथवर टोपल्या विकण्याचे काम करते. अशात स्वताचे दुकान नसल्यास उद्वभवणा-या त्रासाचा तिला चांगला अनुभव आहे.

दरम्यान सदर उपक्रमा अंतर्गत मतदार संघातील दोन दिव्यांग बांधवांना दुकान उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर आज शहरातील बंगाली कँम्प येथील मालती देवनाथ या निराधार महिलेला दुकान उपलब्ध करुन देण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा यांनी या दुकानाचे उद्घाटन केले. अम्मा स्वतः फुटपाथवर बसुन टोपल्या विकते त्यामुळे फूटपाथवर दूकान लावतांना येणा-या अडचणींची तिला जाण आहे. त्यामुळे आपण सदर उपक्रम सुरु केला असल्याचे अम्मा यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना आणि शहरी भागात निराधार गरजु महिलांना सदर दुकान देणार असल्याचेही अम्मा यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये