ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिएसएनएलने केबल लाईनसाठी खोदलेली नाली बुजवलीच नाही

जनावरांसह शेतकऱ्यांनाही होतो त्रास ; कंत्राटदाराचा मनमानी कारभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

तालुक्यातील विविध गावांना बिएसएनएल मोबाईल नेटवर्क व टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. टॉवर पर्यंत केबल लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यासाठी नालीचे खोदकाम करण्यात आले मात्र बऱ्याच ठिकाणी खोदलेली नाली बुजावण्यात आली नसल्याने जनावरांसह शेतकऱ्यांनाही याचा त्रास भोगावा लागत असून दुर्घटना होण्याची शक्यताही बळावली आहे.

    जिवती-शेणगाव मार्गावर केबल लाईन टाकण्यासाठी नालीचे खोदकाम करण्यात आले आहे.बऱ्याच दिवसांपासून हि खोदलेली नाली बुजावण्यात आली नाही.परिणामी जंगलात चराईसाठी जाणाऱ्या जनावरांना व शेतकऱ्यांना शेतात शेती कामांसाठी जाताना नाली ओलांडून जाणे धोक्याचे ठरत आहेत.अनेकवेळा तर या नालीत जनावरे अडकून बसल्याने भटकी कुत्रांनी पाळिव जनावरांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.जिवती -रोडगुडा रस्त्यालगत खोदलेल्या बिएसएनएल च्या केबल लाईन नालीत देवलागुडा येथील मारोती शंकर जाधव यांची म्हैस नाली ओलांडून येताना नालीत पडली यामुळे ती जखमी अवस्थेत नालीत पडून होती.काही वेळ ती नाहीतच पडून राहिल्याने भटकी कुत्रांनी त्या म्हैसीला पुन्हा जखमी केल्याची घटना घडली.

भाईपठार गावात टॉवर उभे करण्यासाठी विना सुरक्षा मजुरांकडून जिवघेणे काम करून घेतले जात होते यात एका पश्चिम बंगालच्या तरूणांचा हाकनाक जीव गेला.तरीही प्रशासन गंभिर नाही,त्या कंत्राटदारांवर कार्यवाही करण्याचे सोडून त्याला पाठबळ दिले गेल्याचे बोलले जात आहे.या सर्व प्रकारामुळे कंत्राटदार आपली मनमानी चालवित आहे.जिवती-रोडगुडा रोडवरील नाली बुजवली परंतु विविध ठिकाणी खोदलेली नाली परिपूर्ण बुजवली गेली नाही त्यामुळे जनावरांनासह शेतकऱ्यांनाही याचा त्रास होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये