ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळोधी पोलीसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालक-मालकावर कारवाई

पुढील तपास सुरू आहे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

नागभीड – तालुक्यातील तळोधी(बा.) पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी सोमवारी रात्री गस्त घातली असताना ठाणेदार मंगेश भोयर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रात्री गस्तींवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवनापूर वाढोणा या मार्गावर – नाकेबंदी करून चोर मार्गाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

यामध्ये टॅक्टर मालक अक्षय दिगांबर सांगिडवार रा. सोनापूर तुकूम व विलास पुंडलिक गोबाडे रा. वाढोणा ता. नागभीड यांचा समावेश आहे. तालुक्यातील सावरगाव, चिखलगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात चोर मार्गाने रेती तस्करी होत असल्याची माहिती आहे. तळोधी पोलीसही या तस्करांच्या मागावर अलर्ट आहेत.

दरम्यान,सोमवारी रात्रौच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना रात्रौ रेती तस्करी होत असल्याची माहिती ठाणेदार भोयर यांना मिळाली. आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी रेती चोरून नेत असताना जीवनापूर वाढोणा मार्गांवर – टॅक्टर पकडले. आणि ट्रॅक्टर क्र.एम.एच. ३४ बी.एफ. ७०८४ व ट्राली क्रमांक एम.एच. ३४ बी. आर. १३०६ हे वाहन ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान ट्रॅक्टर चालकाजवळ कोणताही रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने ती रेती चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रॅक्टर मालक अक्षय दिगांबर सांगिडवार रा. सोनापूर तुकूम व ट्रॅक्टर चालक विलास पुंडलिक गोबाडे रा. वाढोणा तह. नागभीड यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तळोधी येथे अपराध क्र. 255/2023 कलम 379, 34 iPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांचा मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये