गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीच्या मोटर सायकल बाळगुण त्यांची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती

सदर वाहन व आरोपी पोलीसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12/04/2024 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोहवा शैलेश चाफलेकर यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली कि, आर्वी नाका येथे एक ईसम हा चोरीच्या मोटर सायकल बाळगुण त्यांची विक्री करीत आहे, अशा माहीती वरूण पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील पोलीस अंमलदार हे खबरे प्रमाणे आर्वी नाका येथे गेले असता तेथे इटनकर यांचे पानठेल्याजवळ एक ईसम हा संशयातरित्या दिसुन आला, त्याचे ताब्यात दोन मोटर सायकल 1) एक काळया रंगाची हिरो स्प्लेंडर वाहन क एम एच 27 ए वाय 7828 व 2) एक काळया रंगाची शाईन नंबर नसलेली जिचा चेसीस क्रमांक ME4JC36JDE7892015 व इंजीन क्रमांक JC36E73430980 असा असलेली मोटर सायकल मिळुण आली, सदर ईसम यास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव आकाश पुरुषोत्तम चव्हाण वय 27 वर्ष रा. बोरखडी कला, त. सेलु, जि. वर्धा असे सांगीतले,

सदर मोटर सायकलचे मालकी हक्का बाबत त्यास विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देउ लागला, त्यास विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने दोन्ही मोटर चोरीच्या असल्याबाबत सांगीतले, सदर मोटर सायकल बाबत शहानीशा केली असता हिरो स्प्लेंडर वाहन क एम एच 27 ए वाय 7828 ही चांदुररेल्वे येथुन चोरली असुन त्याबाबत पो स्टे चांदुररेल्वे येथे गुन्हा दाखल आहे, तसेच एक काळया रंगाची शाईन नंबर नसलेली जिचा चेसीस क्रमांक ME4JC36JDE7892015 व इंजीन कमांक JC36E73430980 ही अमरावती येथुन चोरी केली असुन त्याबाबत पोलीस स्टेशन गाडगेनगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल आहे,

अशी माहीती मिळाल्याने संशयीत ईसम यास ताब्यात घेउन त्याचेवर कार्यवाही करूण चांदुररेल्वे येथील पोलीसांना बोलाउन सदर वाहन व आरोपी त्यांचे ताब्यात देण्यात आले, सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याने अनेक मोटर सायकल चोरी केल्या आहे, त्यांचे ताब्यातुन वर्धा पोलीसांनी दोन चोरी केलेल्या मोटर सायकल हस्तगत केल्या, सदर दोन्ही मोटर सायकल त्याने एकट्यानेच चोरल्या असल्याचे सांगीतले,वरूण त्यास अटक करूण दोन गुन्हे उघडकिस आणले. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक वर्धा पराग पोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी, पोलीस उपनिरीक्षक शिनुकुमार बानोत, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, किशोर गाडेवान, पवन लव्हाळे, किशोर पाटील, राधाकिशन घुगे, पोलीस शिपाई नंदकिशोर धुर्वे, उज्वल घंगारे, अमोल साळवण, रंजीत भुरसे, सोनु गायकवाड, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये