ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२१ एप्रिलला स्व. जतिरामजी बर्वे यांच्या जयंती समारोहाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ, चंद्रपूरच्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी, मत्स्यमहर्षी स्व. जतिरामजी बर्वे यांचा जयंती समारोह दि.२१ एप्रिलला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपावेतो स्वर्गीय खासदार जतिराम बर्वे सभागृह एकलव्य वसतिगृह,मुल रोड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या जयंतीच्या निमित्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, समाज प्रबोधनपर कार्यक्रम तथा मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती तथा माजी सदस्य राज्य मागासवर्गीय आयोग चंद्रलालजी मेश्राम, प्रमुख अतिथी आ.सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, सुनिताताई लोढिया, माजी नगराध्यक्षा मनपा चंद्रपूर, बाबासाहेब देशमुख, सहा. आयुक्त समाज कल्याण विभाग, चंद्रपूर, प्रकाश डायरे, से.नि. सहसंचालक विदर्भ विकास मंडळ, नागपूर,सत्कार मूर्ती कृष्णाजी नागपुरे गुरूजी, अध्यक्ष चं. जि.भो.स.से.सं. चंद्रपूर,महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर “समाजभूषण” पुरस्कार २०२४ प्राप्त तथा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड,नवी दिल्ली,प्रा.डॉ. योगेश्वर दूधपचारे, जनता महाविद्यालय, चंद्रपूर बेस्ट “जिओग्राफर” २०२३, कोंकण “जिओग्राफीकल” असोसिएशन मुंबई. “भूगोलशास्त्रभूषण” अवार्ड २०२४, डेक्कन “जिओग्राफर” सोसायटी,उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद येथे प्राप्त,दीनानाथजी वाघमारे, मुख्य संघटक, संघर्ष वाहिनी, नागपूर चं.जि.भो.स.से.संघ, चंद्रपूर तर्फे “समाजभूषण” पुरस्कार प्राप्त हे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

या होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष प्रा.डॉ. योगेश्वर दूधपचारे आणि श्रीहरी शेंडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये