गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरराज्यीय आरोपीसह दुकाने व घरफोडी करणारा अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दोन DVR सेटसहित चोरीतील इतर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       मागील काही दिवसापासून वर्ध्यातील मार्केट लाईन मधील दुकाने फोडण्याचा प्रकार सुरू होता व चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता व चोरटे चोरी केल्या नंतर फुटेज मिळु नये म्हणून दुकानातील कॅमेरा चे DVR सेट चोरून सोबत घेऊन जात असत यामुळे त्यांना शोधणे अजून आव्हानात्मक झाले होते वरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने या चोरीस आळा घालण्यासाठी रात्र गस्त व चोरी दरम्यान संशीत ईसमावर पाळत ठेऊन त्यांचे बाबत सविस्तर माहिती मिळवली असता मिळालेले विश्वसनीय माहितीवरून आरोपी राजा उर्फ मानून रशीद फारुकी वय.45 वर्ष रा.हवालदार पुरा वर्धा याला नागपूर वरून ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता.,

         त्याने त्याचा साथीदार देवाशिस सरकार रा संतीपूर वेस्ट बंगाल याचे सोबात मार्केट लाईन मधील आठ दुकाने व एक घर फोडल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली साहित्य व सायकल सहित चोरलेला DVR तसेच चोरीतील ईतर मुद्देमाल हा राजा याच्या घरुन जप्त करून उर्वरित मुद्देमाल हा आरोपी  देबाशिस सरकार रा:- संतीपूर वेस्ट बंगाल (पसार) याचे जवळ असल्याची कबुली दिल्यावरून सदर आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पो.स्टे.वर्धा शहर याच्या ताब्यात देण्यात आले.

      सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सा. वर्धा श्री नूरल हसन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. सागर कवडे सा. यांचे आदेशान्वये पो नी. श्री संजय गायकवाड स्था गु शा. वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, अमोल लगड, पो.हवा नरेंद्र पराशर, अमरदीप पाटिल, नितीन इटकरे, संघसेन कांबळे, मिथून जिचकार, अनुप कावळे, अंकित जिभे सर्व स्था.गु. शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये