ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहुल गांधी यांचा वाढदिवस घुग्घुसमध्ये उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

दि. 19 जून 2025 को लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि जननायक राहुल गांधी यांचा वाढदिवस घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ऐतिहासिक गांधी चौक येथे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात केक कापून वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सादलावार, सैय्यद अनवर, शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव सुरज कन्नूर, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, शेखर तंगडपल्ली, शेख शमिउद्दीन, सत्यनारायण डकरे, विजय माटला, रोहित डाकूर, दिपक पेंदोर, सुनिल पाटील, अरविंद चहांदे, थॉमस अर्नाकोडा, कपिल गोगला, सुरज मिश्रा, अजय त्रिवेणी, शहंशाह शेख, गणपत लभाने, अंकुश सपाटे, इप्पा मारय्या आदी उपस्थित होते.

महिला काँग्रेसकडून देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यामध्ये महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, शहराध्यक्ष संगीता बोबडे, जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, सचिव दुर्गा पाटील, मंगला बुरांडे, पुष्पा नक्षीने, संध्या मंडल, शिल्पा गोहील, सविता कोवे, वंदना क्षीरसागर, नंदा पचारे, जोया शेख, नानीबाई क्षीरसागर, अश्विनी धुर्वे, वर्षा पाटील, राबिया शेख, शिलाताई धोबे, रेखा रेगुंडवार, कौशल्या माणुसमारे, सुनीता श्रीवास्कर, लक्ष्मीबाई गोदारी, गुलशन शेख, सुनंदा नांदे, कामिनाताई वैद्य, सुशीला तुराणकर, सिमा उमाटे, वंदना उमाटे, प्रतिभा वासेकर, वृंदा हनुवंते, सुनीता हिवरकर, विद्या चौधरी, अविना कामातवार, गंगाबाई पचारे, विमलाबाई चौधरी, बडू रोहणकर, बुधम्मा इरला, ओडेक्का कासु, सुगना डोमा, पोसूबाई गोदारी, सररू बाई गोदारी, ईश्वर अक्का, सरोजा ढोके, शारदा अक्का यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली. राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षबळ वाढवण्याचा संकल्प यावेळी केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये