ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप तर्फे हेमलकसा येथिल लोकबिरादरी प्रकल्पाला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप गडचांदूर तर्फे जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा या गावी असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली या भेटीत लोकबिरादरी प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पाची आणि शिक्षण, आरोग्य व इतर सामाजिक कार्याबद्दल समाजसेवक श्री अनिकेत आमटे यांनी सविस्तर माहिती दिली या दरम्यान शाळा, दवाखाना,प्राणिसंग्रहालय, ग्रंथालय व विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार, उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार,केंद्रप्रमुख संजय त्रिपतिवार,नथुजी देवाडकर,लक्ष्मण खुठेमाटे,जगदीश ठावरी, रामकृष्ण नागरगोजे,अनिल वाघमारे,गिरीष कामडी आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये