गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव पोलीसांची रेती माफियांवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि.07/04/2024 रोजी सकाळी पुलगाव पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन पुलगाव पोलीसांनी रेती माफियांवर दोन कारवाया केल्या असुन एका कारवाईत 1) एक हिरव्या रंगाचा जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच./32/ए./6763 ज्याची अंदाजे किंमत 6,00,000/- रू. 2) एक हिरव्या रंगाची ट्राली क्रमांक एम.एच./32/ए./6764 ज्यामध्ये रेती भरून असलेली अंदाजे किंमत 1,50,000/- रू. 3) अंदाजे 1 ब्रास रेती अंदाजे किंमत 7,000/- रू. 4) एक जुनी वापरती काळया रंगाची हिरो स्प्लेंडर गाडी क्र. एम.एच./32/ए.टी./0897 अंदाजे किंमत 40,000/- रू. 5) एक सॅमसंग कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल अंदाजे किंमत 15,000/- रू. 6) एक रिलमी कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल अंदाजे किंमत 12,000/- रू. असा जुमला किंमत 8,24,000/- रू. चा माल जप्त करण्यात आला तसेच सदर गुन्हयात 1) षुभम राजेन्द्र लोखंडे, वय 27 वर्श, रा. कवठा झोपडी, ता. देवळी 2) विधीसंघर्शीत बालक 3) चालक/मालक प्रविण गवते, रा. नाचणगाव, ता. देवळी (पसार) यांना आरोपी करण्यात आले. तर दुसऱ्या कारवाईत पोलीसांनी दोन्ही ट्रॅक्टर चे चालक मालक ट्रॅक्टर चालक सतिष रमेषराव नान्हे, रा. नाचणगाव ट्रॅक्टर मालक जगदिश भिमरावजी मस्के, रा.पुलगाव चालक शुभम विष्णू सरवे, नाचणगाव ट्रॅक्टर मालक बबलु अरूणराव मेंढे, रा, भिमनगर, पुलगाव यांचे ताब्यातुन दोन ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टर ला लागुन असलेल्या दोन्ही ट्राली मध्ये रेती भरून असे 15,10,000/- रू. चा माल जप्त करून सदर दोन्ही ट्रॅक्टर व ट्रालीचे मालकांवर कारवाई करने बाबत तहसिल कार्यालय, देवळी यांना पत्र देवुन पुढील कारवाई करीता मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, देवळी यांचे ताब्यात देण्यात आले. वरील दोन्ही कारवाईत पुलगाव पोलीसांनी एकुण जु.कि. 23,34,000/- रू. चा माल जप्त केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

 सदरची कारवाई श्री. नुरूल हसन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, श्री. राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक सा. पुलगाव व श्री. राहुल सोनवणे, पोलीस निरिक्षक सा. पो.स्टे. पुलगाव यांचे मार्गदर्षनात पोलीस उपनिरिक्षक जाधव, स.फौ. सुधीर लडके, पोहवा रितेष गुजर, चंद्रषेखर चुटे, पो.अंम. विष्वजित वानखेडे, ओम तल्लारी, उपविभागीय पोलीस कार्यालयाचे षुभम कावळे, प्रणय इंगोले, रामदास दराडे, भुशण हाडके यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये