ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोविंद पेदेवाड व तुकाराम धंदरे या शिक्षकांची जिल्हास्तर निपुण साहित्य प्रदर्शनासाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार केंद्र व राज्य स्तरावरून इयत्ता तिसरी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानात प्राविण्य प्राप्त करावे तसेच इयत्ता तिसरीच्या पुढे गेलेल्या मात्र अपेक्षित क्षमता प्राप्त न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून कोरपना पंचायत समिती चा तालुकास्तरीय ” निपुणोत्सव “जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे संपन्न झाला.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरी मुसळे केंद्रप्रमुख गडचांदूर यांनी केले. तदनंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक तथा पाहुण्यांना निपुण प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनाथ खंडारे विस्तार अधिकारी(शिक्षण) यांनी असर आणि राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) यांचा अहवाल सादर करत पायाभूत स्तरातील (वयोगट ३ ते ९ वर्ष)विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता विकसन होण्याची गरज प्रकर्षाने व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुनील कोहपरे (केंद्रप्रमख) भोयगाव यांनी विद्यार्थी,शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले.

      या निपुणोत्सव कार्यक्रमात प्रत्येक केंद्रातून एक शैक्षणिक साहित्याचे स्टॉल लावण्यात आले होते.सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी शैक्षणिक साहित्य समजावून घेतले. यावेळी पंचायत समिती कोरपनाचे गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी यांनी आवर्जून भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सहभागी शिक्षकांचे अभिनंदन केले. या शैक्षणिक साहित्य स्टॉल मधून गोविंद पेदेवाड जि.प.प्राथ.शाळा, लालगुडा व तुकाराम धंदरे जि.प. उच्च प्राथ.शाळा आसन(खु.)या शिक्षकांची जिल्हास्तर साठी निवड करण्यात आली.

  या कार्यक्रमाला पं.स.कोरपना चे गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी, पारडी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी लोकनाथ खंडारे, केंद्रप्रमुख श्री.मुसळे, श्री. तलांडे, श्री. कामतवार,श्री.राठोड,श्री. कोहपरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. बंडु बोढाले,शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोरे तसेच गटसाधन केंद्र कोरपनाचे विषय तज्ज्ञ श्री. भंडारवार, श्री. टेकाम, श्री.कोरडे,झाडे मॅडम,श्री.झिले आदी मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे संचालन निलेश मडावी तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण गावंडे या शिक्षकांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये