ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद देऊळगाव राजाच्या वतीने 10 एप्रिलला दिव्यांग मतदारांची भव्य रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

SWEEP उपक्रमांतर्गत नगर परिषद देऊळगाव राजा, महसूल विभाग देऊळगाव राजा, शिक्षण विभाग देऊळगाव राजा, सर्व शाळा व यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता म्यु.श्री.शिवाजी हायस्कूल, देऊळगाव राजा येथून दिव्यांग मतदारांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी देऊळगाव राजा शहर व परिसरातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी सदर रॅलीत सहभागी होण्याकरिता हजर रहायचे आहे. ज्यांना शक्य असेल त्या दीव्यांग बांधवांनी स्वतःची दोन चाकी, तीन चाकी वाहन घेऊन न चुकता वेळेवर हजर रहायचे आहे. शहराच्या मुख्य रस्त्याने मतदान जनजागृती रॅली जाणार असून सदर रॅलीस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि शहरातील प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत भाग घेऊन एक सुजाण व जागरूक नागरिक असल्याचे सिद्ध करण्याच्या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

“गरीब-श्रीमंत, जात-धर्म-लिंग या भेदापासून दूर म्हणजे आपले मत, सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाची प्रतिबिंब म्हणजे आपले मत” लोकशाहीतील समानतेचे ही मूल्य अधिक बळकट करू या, चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया.

“जागरूक आणि जाणकार मतदार होऊ या, खऱ्या माहितीच्या आधारे योग्य उमेदवार निवडू या”

“प्रलोभन मुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू” असे आवाहन अरुण दे.मोकळ, मुख्याधिकारी, न.प.देऊळगाव राजा यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये