ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध गौवंश तस्करीचे तीन वाहन जप्त

सावली पोलिसांची कारवाई ; १३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

दि. ०४ एप्रिल २०२४ अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून व्याहाड (बुज) – केरोडा मार्गावर नाकाबंदी करून संशयित बोलेरो पिकअप एम एच ३४ बिजी ७५३९ हे वाहन थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये चार जनावरे अंदाजे किंमत ४० हजार रुपये आणि बोलेरो पिकअप ०५ लाख रुपये असा एकूण ०५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यात आशिष मुनाफ कुरेशी आणि मोहसीन रजाक कुरेशी दोघेही राहणार चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच ०७ एप्रिल ला सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चारगाव – भारपायली मार्गावर नाकाबंदी दरम्यान एमएच. के.४०९९ बोलेरो पिकअप या वाहनांमध्ये ०४ बैल आणि एमएच. एजे २७९६ टाटा इंस्ट्रा या वाहनांमध्ये ०४ बैल असे एकूण ०८ बैल आणि दोन वाहने मिळून १३ लक्ष ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यामध्ये संदेश एकनाथ फुलके,पवन शालिकराम

बोळणे,जयेंद्र तेजराम बिसेन तिघेही राहणार गोंदिया यांचेवर कलम 11(A)(D),1960 आणि 5(A) (1),9 – 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात ठाणेदार जीवन राजगुरू यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे,पोलीस हवालदार संजय शुक्ला,पोलीस अमलदार चंद्रशेखर गंपलवार,अशोक मडावी यांनी केली.

एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या कारवाईमुळे अवैध गोवंश करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले असून पोलीस विभाग याकडे लक्ष देऊन आहे.सध्याच्या परिस्थितीत अवैध गोवंश वाहतूक ही मोठ्या वाहनाने न करता छोट्या वाहनाने आणि पायदळ केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये