ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावकऱ्यांनी अवैध दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या केले स्वाधीन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपणा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना असून लोकसभा निवडणुकीचे वातावरण  शेरज बू  गावात तापत असताना गेल्या कित्येक दिवसापासून गावात अवैध देशी दारूची खुलेआम विक्री यामुळे गावातील शांतता भंग पावत होती तसेच शेरज बू गावातील तरुण पिठी व्यसनागधिन लहान मुले दारूच्या आहारी अशी विचित्र परिस्थिती शेरज बू गावाची दारूबंदीसाठी ठराव पारीत करून कोरपणा पोलीस स्टेशनला देऊन दारूबंदीसाठी सहकार्य मांगितले चार पाच वेळा ग्रामस्थांनी दारू पकडून पोलिसांच्या अवैध दारू विक्रेत्यांना स्वाधीन केले मात्र गावातील दारू बंद होईना.

मात्र,आजच्या घटने मूळे वेगळे वळण मिळाले असून सकाळी आठ वाजताच्या सुमारास अवैध देशी दारू करणारी स्कुटी गावातील महिला व नागरिकाणी पकडली त्या स्कुटीवर अवैध देशी दारूच्या पेट्या होत्या.याबाबत पोलीस स्टेशन कोरपणा यांना माहिती देण्यात आली  पोलीस घटना स्थळी आले मात्र गावकऱ्यांनी रोष निर्माण केला पंचनामा कार्यवाही गावातच करा .यापुर्वीच्या पोलीस कार्यवाहीचे काहीच झाले आम्ही गावकरी नांदाफाता नाहीतर चंद्रपूर  ला एस पी जातो अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थानी घेतली त्यामुळे घटनास्थळी उपस्तित पोलीस शिपाई यांनी वरिष्ठ अधिकारी कोरपणा पोलीस स्टेशनंचे पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकण याना शेरज बू येथील परिस्तिथी अवगत करून दिली.

केकण साहेब यांनी क्षणाचा विलंब न करता शेरज बू गाठले व ग्रामस्थानशी संवाद गेला गावातील अवैध दारू विषयी समस्या जाणून घेतल्या सदर घटनेतील आरोपी याच्यावर कार्यवाही होईल गावातील दारू बंदी साठी सहकार्य होईल असे बोलून  गावातील पंचसमक्ष पंचनामा करून पुढील कार्यवाही  गावकऱ्यांनी पकडलेले देशी दारू व स्कुटी अंदाजे चाळिस हजार रुयये मुद्देमाल जप्त करून ठाण्यात पाठवीला तसेंच घटना स्थळावरून आरोपी प्रशांत मेश्राम रा.वनसडी याला अटक व फरार आरोपी  नागेश डोंगरे, विठ्ठलं डोंगरे,व मिलिंद डोंगरे याच्यावर कोरपणा ठाण्यात अप क्र ७४/०२४ कलम ६५  (अ ) (इ)८३  मदाका  गुन्हा नोंद करून फरारी आरोपी यांचा शोध घेत य्आहे सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकण,पोशी बळीराम जाधव,नापोशी साईनाथ जायभाये,पोशी विक्रम दासलवार, पोशी गणेश डावरे यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये