ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांबोडे ग्रामीण रुग्णालय कोरपणा यांच्या विरोधात आंदोलन

अखेर डॉक्टरांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बांबोडे हे मुख्यालय हजर राहत नाही व रुग्णांना सेवा देत नाही याकरिता तालुका काँग्रेस कमेटी कोरपणा कडून ग्रामीण रुग्णालय समोर दिनांक 27.1.2024 ला धरणे आंदोलन करण्यात आले डॉ,बांबोडे हे दिनांक 10 /5 /2024 पासून ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झाले परंतु तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कधीही रुग्नाला सेवा दिली नाही किंवा कधीही ओपीडी चालवली नाही ते हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा येऊन ऑफिसमध्ये बसून ऑफिसचे काम करून राजुरा निघून जातात डॉ, बांबोडे हे बाल रोग तज्ञ असून त्यांनी कधीही बाल रुग्णांना सेवा दिलेली नाही त्यामुळे कोरपणा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील गोरगरीब रुग्णांना अतिशय त्रास होतो डॉक्टर बांबोडे हे कधीही मुख्यालय हजर राहत नसून रुग्णालयामध्ये नेहमीच साफसफाई राहत नाही कार्यालयीन काम करिता किंवा दवाखान्याच्या कामाकरिता फोन केला असता डॉ, बांबोडे म्हणतात मी वैद्यकीय अधीक्षक आहे मला मुख्यालय राहण्याची गरज नाही ते स्वतः राजुरा येथे स्वतःचा खाजगी दवाखाना चालवितात एवढेच नव्हे तर आमच्या माहितीप्रमाणे आपल्या ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी दोन ते तीन महिने पगार विना काम करीत आहे व स्वतः गैरहजर राहून हजरीपटावर सही करत नाही व कर्मचारी उपस्थित राहून त्यांना गैरहजर दाखवून पत्र व कारणे दाखवा नोटीस देऊन मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत नाही सफाई कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी यांचे सहा ते सात महिन्यापासून पगार नाही रुग्णालयात कर्मचारी डॉक्टर बाबोडे गैरहजर असल्यामुळे कर्मचारी वेळेवर येत नाही त्यामुळे जन्म मृत्यू प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र व इतर कामे जनतेची होत नाही डॉ, बांबोडे यांची मेळघाट येथे बालमृत्यू रोखण्यासाठी दिनांक 25/ 9/ 2023 ते 9 /10 /2023 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे तालुका धारणी जिल्हा अमरावती येथे प्रतिनियुक्ती दिली असताना दिनांक 9 /11 /2023 ते 23/ 11/ 2023 या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र हरिहर तालुका धरणी येथे प्रतिनियुक्ती दिल्ली असता त्या दोन्ही ठिकाणी न जाता राजूरा येथे राहून स्वतःचा दवाखाना चालविला व जनतेची तथा शासनाची फसवणूक करून त्या काळातील वेतन त्यांनी उचलले याबाबत योग्य ती चौकशी करून डॉक्टर बांबोडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी याबाबत आम्ही अनेकदा डॉक्टर बांबोडे यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला उडवा उडवी चे उत्तर देत होते याबाबत मा आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे मार्फत लेखी व तोंडी तक्रार देण्यात आली होती

परंतु अजून पर्यंत कोणतेही कारवाई झालेली नाही म्हणून तालुका कमिटीतर्फे 27/ 1 /2024 रोजी शनिवारला ग्रामीण रुग्णालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनला कोरपणा ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी काही तासातच डॉक्टर बांबोडे यांनी आंदोलन स्थळी स्वतः येऊन चर्चा केली व लेखी स्वरूपात आंदोलन करताना लिहून दिले समोर अशी दिरंगाई केल्या जाणार नाही आंदोलन करते आणि तूर्तास आंदोलन मागे घेऊन आंदोलन यशस्वीरित्या पार पडले कोरपना तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन उभारण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, भाऊराव कारेकार, भाऊजी चव्हाण, सुरेश मालेकर,सीताराम कोडापे,रसूल भाई, उतम अवताळे,अनिल गोंडे, ताराचंद मुंके, रमजान भाई, इब्राहिम भाई, लक्ष्मण पंधरे, मनोहर चने, किरण शेंडे, अब्दुल रहमान भाई, रमेश बोर्डे, बंडू पितुरकर, निसार शेख,होते आदीची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये