गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन पुलगांव शहरातील कुख्यात दारु तस्कराविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगांव शहरास आणी आजुबाजुच्या गावागावात मोठया प्रमाणात अवैधरीत्या देशी, विदेशी, गावठी मोहा दारुची अमरावती जिल्हयातून तस्करीच्या मार्गाने दारुचा पुरवठा करुन त्याची विक्री करणाऱ्या कुख्यात दारु विक्रेता दिनेश नारायणदास माठा, वय ३७ वर्षे, रा. सिदी कॉलनी, कॅम्प रोड, पुलगांव, ता. देवळी, जि. वर्धा याचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये सन २००४ ते २०२४ पावेतो पोलीस स्टेशन पुलगांव जि. वर्धा चे अभिलेखावर एकुण २३ गुन्हयांची नोद आहे.

ज्यामध्ये मोठया प्रमाणात गावठी मोहा दारु, देशी विदेशी मदयाची सिमावती अमरावती जिल्हयातून प्रतिबंधीत वर्धा जिल्हयात चार चाकी वाहनाने तस्करी करुन पुलगांव तसेच आनुबानुच्या परिसरात त्याची विक्री करण्याकरीता पुरवठा करीत होता तसेच स्वतः सुध्दा त्याचे राहते घरी विक्री करीत होता. मागील ३ वर्षाचे कालावधी मध्ये स्थानवध्द दिनेश माटा याचे ताब्यातुन ५ चारचाकी, ३ दुचाकी वाहनासह ९ गुन्हयामध्ये एकुण २८,४३,४००/- रु. ची देशी विदेशी, गावठी मोहा तसेच अतिशय महागडया दारु सुध्दा जप्त करण्यात आलेली होती.

त्याचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करुन सुध्दा स्थानबध्दाच्या दारु तस्करीवर कोणताही परिणाम झालेला नव्हता. ज्यामुळे पोलीस स्टेशन पुलगांव परिसरातील सार्वजनीक स्वास्थावर विपरीत परिणाम झाला होता, सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती.

तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, श्री . बनवले यांनी एम.पि.डि ए. कायदयान्वये स्थानवध्द प्रस्ताव तयार करुन श्री. राहुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव यांनी योग्यरीत्या पाठपुरावा करुन स्थानबध्दतेचा प्रस्ताव मा. नुरुल हसन, पोलीस अधिक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. राहुल कडीले जिल्हादंडाधिकारी, वर्धा यांना सादर करण्यात आला होता. सदर स्थानबध्द प्रस्तावाची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेवुन तसेच आगामी होवु घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा

निवडणुक २०२४ लक्षात घेता, लोकसभा निवडणुका २०२४ हया निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभन मुक्त वातावरणात पार पाडाव्यात याउद्देशाने मोठया प्रमाणात अवैधरीत्या दारुची तस्करी करुन विक्री करणा-यावर आळा घालण्याकरीता स्थानचध्दतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. दिनांक ०२ एप्रिल २०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी करण्यात आलेला असून त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द ठेवण्यात आलेले आहे.

तसेच पुढे होवु घातलेल्या सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ लक्षात घेता, लोकसभा निवडणुका निर्भीड वातावरणात तसेच विना प्रलोभणाने पार पाडण्याचे उद्देशाने येणाऱ्या काही कालावधी दरम्यान अशा दारु विक्रेत्यावर तसेच गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यावर कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, श्री. राहुल चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, ठाणे प्रभारी अधिकारी, पुलगांव श्री. राहुल सोनवणे, सहा. पोलीस उप निरीक्षक संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पोहवा / अमोल आत्राम, स्था.गु.शा. वर्धा, पोहवा राजेंद्र हाडके, महादेव सानप, विनोद रघाटाटे, पो.स्टे. पुलगांव यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये