ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आचारसंहिता भंग प्रकरणी कर्मचारी निलंबित

आक्षेपार्ह व्हॉट्स ॲप स्टेटस् ठेवणे वन कर्मचाऱ्याला भोवले

चांदा ब्लास्ट

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असुन संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्ष, नेते ह्यांचेसह शासकीय कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनाही आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. आचारसंहितेचे उल्लंघन गुन्हा असल्याने कुणीही आक्षेपार्ह वर्तन अथवा कृती केल्यास त्याच्यावर कारवाई केल्या जाते हा नियम असुन शासकीय कर्मचाऱ्यांना हे सर्व नियम माहिती असुनही चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल होताच सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीअंती सदर कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले.

प्राप्त माहितीनुसार, वनविभाग पांढरकवडा येथील वाईल्डलाईफ विभागात लिपिक पदावर कार्यरत शिवशंकर मोरे यांनी व्हॉट्स ॲप स्टेटस वर मतदान यंत्राबाबत (ई व्ही एम) बाबत संशय घेणारे तसेच त्याबाबतीत ये सच्चाई है असे लिहून ई व्ही एम बाबत मतदारांचा विश्वास डळमळीत करणारे स्टेटस ठेवले. ह्यामुळे शासकीय कर्मचाऱ्याने खोट्या माहितीचा प्रचार करणे, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, व इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यास माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करण्यात आल्याचे स्टेटस वर आढळून आले, याबाबत सुजाण नागरिकाने मोरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार देत पुरावा म्हणून त्यांनी ठेवलेल्या व्हॉट्स ॲप स्टेटस्चा व्हिडीओ सादर केला होता.

शिवशंकर मोरे हे स्वतः शासकीय कर्मचारी असून त्यांचे हे वर्तन अशोभनीय असल्यामुळे तसेच ह्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांचेवर लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम १९५१ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर विभागीय वन अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले व केलेल्या कारवाईचा अहवाल सहाय्यक निवडणूक अधिकारी चंद्रपूर लोकसभा क्षेत्र यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आदेश सुहास गाडे यांनी दिले होते, निवडणूक काळात वनविभागातील कर्मचाऱ्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने तात्काळ मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये