जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे शालेय मंत्रिमंडळ स्थापन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव पंचायत समिती कोरपना येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजावे व भविष्यातले नेतृत्व त्यांनी स्वीकारावे याकरिता शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडली. वर्ग पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. गुप्त मतदानामधून शाळेचे मुख्यमंत्री ची निवड करण्यात आली.
इयत्ता आठवीचा विद्यार्थी अंश विकास पिंगे याची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली, तर उपमुख्यमंत्री म्हणून प्रेम श्रीराम शेंडे याची निवड करण्यात आली. मंत्रिमंडळामध्ये वास्तव्या शेडमाके, सिद्धेश्वरी कोलांडे, सलोनी झाडे, कल्याणी परसुटकर, आराध्या पाचभाई, आरती गुरनुले, सारिका शेंडे, अन्वय कुचनकर, ऋषभ धोटे, समीर टोंगे यांची देखील मंत्री म्हणून निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सखाराम परचाके यांनी कामकाज पहिले तर यशस्वीतेसाठी पुष्पा इरपाते, विनायक मडावी अनिल राठोड नितीन जुलमे काकासाहेब नागरे व सचिन सोनपित्रे यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळांना ब्लेझर व बॅचेस चे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले.