गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गर्दीच्या ठिकाणावरून हातसफाई करून सोन्याचे दागीने चोरणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश

एकुण जुमला किंमत 1 लाख 84 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    १) फिर्यादी भिमराव शंकरराव ताकसांडे, वय 60 वर्ष, रा. नेरी (मिरापूर) हे दि. 07/01/2024 रोजी मनोहर तुकाराम ढोमणे यांचे सोन्याचे दुकानातून सोन्याचे लाॅकेट, सोन्याचे मनी एकुण किंमत 59,722/- रूपयाचे विकत घेवून बजाज चैक, वर्धा येथून अँटोत बसून त्यांचे गावी नेरी (मिरापूर) येथे जाण्यास निघाले. त्याच अँटोत बोरगाव (मेघे) येथून दोन महीला बसल्या होत्या व त्या इंझापूर येथे उतरल्या. फिर्यादि हे गावी गेल्यानंतर त्यांनी विकत घेतलेले सोन्याचे दागीने त्यांना दिसून आले नाही. फिर्यादी यांचे दागीने चोरी गेल्याचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन – वर्धा (शहर) येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

      2) फिर्यादी – रंजना उमेश आशष्टणकर, रा. हनुमान मंदीर जवळ, नेहरू वार्ड, चंद्रपूर या दि. सदर 16/01/2024 रोजी हिंगणघाट येथून चंद्रपूर कडे जाण्यास हिंगणघाट बस स्टॅन्ड येथे बस मध्ये चढून बस ची टिकीट काढण्याास पर्स मध्ये पैसे पाहत असता त्यांनी ठेवलेली 4 तोळयाची सोन्याची पोत कि. 1,10,000/-रू. दिसून आली नाही. बस स्थानक हिंगणघाट येथून गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सोन्याची पोत चोरून नेल्याचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

     3) फिर्यादी –  स्नेहल विजय घुडे, रा. साबळे प्लाॅट, वर्धा या दि. 04/01/2026 रोजी वर्धा येथून खरांगणा येथे बस मधून जात असता आंजी ते खरांगणा दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यकतीने तिचे मोठे पर्सची चैन उघडून आत लहान पर्स ज्यात नगदी 28,000/-रू. असलेली पर्स चोरून नेली. फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पो. स्टे. खरांगणा येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

     सदर वारंवार होणाऱ्या गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी सुरू करून वर्धा जिल्हयात सतत गर्दीच्या ठिकाणावर होत असलेल्या सोन्याचे दागीने चोरीबाबत सर्व घटनास्थळाला भेट देण्यात आली. मोठया प्रमाणात वर्दळ असल्याने व कोणताही भौतीक पुरावा दिसून येत नसल्याने सदरचे गुन्हे करणारे व्यक्तीचां शोध घेणे अवघड होते. सदर गुन्हा उघड करण्याचे दृष्टीने कठोर परीश्रम घेवून व गोपनीय बातमीदार नेमून चोरांबाबत माहीती घेण्यात आली. सदर चोरी संबंधाने मांगगारोडी मोहल्ला, तारफैल, वर्धा येेथून 1) सौ. सत्यफुला भेडन पुरवले, वय 50 वर्ष, रा. सत्रापुर, कन्हान ता. पारषिवनी, जि. नागपुर ह.मु. क्रिष्णा डोळे याचे घरी किरायाणे रा. तारफैल, वर्धा 2) रोशना लेखन शेंडे, वय 28 वर्ष, रा. सत्रापुर, कन्हान ता. पारशिवनी, जि. नागपुर ह.मु. क्रिष्णा डोळे याचे घरी किरायाणे रा. तारफैल, वर्धा यांना ताब्यात घेवून त्यांचे घराची झडती घेतली असता *एका पिस्ता रंगाचे हॅन्ड बॅगचे मधील छोटया स्टीलचे डब्यात एक पिवळया धातुचे लाॅकेट असलेली पट्टी पोथ, एका काळया मन्यामध्ये पिवळया धातु चे लाॅकेट व रूपये बाबत विचारणा केली असता महीला उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याने त्यांना पोलीसी हिसका दाखविताच त्यांनी वरील तिन्ही चोरी केल्याचे कबुली केल्याने दोन्ही महिला आरोपी कडून गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागीने व नगदी 1) सोन्याची पोत अंदाजे वजन 40 ग्राम किंमत 1,10,000/-रू, 2) एक काळया मन्यामध्ये 70 पिवळे धातुचे मनी गुफलेली व लाॅकेट असलेली पोत वजन अंदाजे 09 ग्राम किंमत 59,700/-रू, 3) नगदी – 15,000/-रू असा एकुण जुमला किंमत 1,84,750/- रू चा मुद्देमाल जप्त करून बस स्थानक परीसरात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारे महीला टोळीला अटक करून गुन्हे उघडकीस आनण्यात आलेले आहे.

        सदरची कारवाई श्री नूरूल हसन सा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा, मा. सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वर्धा, यांचे आदेशान्वये पो. नि. संजय गायकवाड स्था.गु.शा., वर्धा यांचे मार्गदर्शनात पोउपनि अमोल लगड, पोउपनि सलाम कुरेशी, पोउपनि ओमप्रकाश नागापुरे, पो.हवा. सचीन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, अरविंद येनुरकर, महादेव सानप, राजेश तिवस्कर, राम ईप्पर, भूषण निघोट, मनीष कांबळे, अल्का कुंबलकर, नीलिमा कोहळे, शुभांगी पुसदेकर, प्रीती ढवळे सर्व नेमणूक – स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये