Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेत फेरीलैंड शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेत शहरातील फेरीलँड शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवीत चौथे स्थान प्राप्त केले केले आहे. अनिकेत गुप्ता, इयत्ता 8 व आयुरासिंग, इयत्ता 7 असे हे दोन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी आहेत.याप्रसंगी शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करुन या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यस. चांद या कंपनीतर्फे सदर राष्ट्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील 52 शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यानंतर नऊ शेळांचे एकूण 18 विद्यार्थी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. अंतिम फेरीत फेरीलैंड शाळेचे सदर दोन विद्यार्थी चौथ्या क्रमवारीत आले. सदर स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल अनिकेत व आयुरा यांचे शाळेचे संचालक अड. युवराज धानोरकर,मुख्याध्यापिका वर्षा धानोरकर, शिक्षकवृंद,तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये