Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८५ वा पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा

विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा भाविकांनी घेतला लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

       श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्री संत झिंगुजी महाराज यांचा ८५ वा पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाद्वारे पार पडला.

     सदर महोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना व श्री ची पूजा आरती, नगर स्वच्छता अभियान, डॉ.यशवंत पोईनकर व डॉ.सारंग लोणारे यांचे सौजन्याने दंत दंत चिकित्सा शिबिर, रांगोळी स्पर्धा व जागृती भजन घेण्यात आले.दुसऱ्या दिवशी योग्या नेत्रालय व सर्जिकल सेंटरचे नेत्रशल्य चिकित्सक डॉ .प्रशांत नागपुरे व डॉ. मोनिका नागपुरे यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.यावेळी १२० रुग्णांची नेत्र तपासणी करून ५४ लाभार्थ्यांना चष्मे वितरीत करण्यात आले.सोबतच चित्रकला व वकृत्व स्पर्धा,सायंकाळी सत्कार समारंभ प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण तसेच गुणवंतांचा सत्कार घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराजभैय्या अहिर, चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, श्री गुरुदेव प्रचारक विशाल गावंडे,मोरेश्वर खेडेकर यांची उपस्थिती होती.याप्रसंगी राष्ट्रपती पुरस्कृत आशा बावणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

सायंकाळी सप्त खंजिरी राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य ह.भ.प.इंजी.पवनपाल दवंडे महाराज अमरावती यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

      शेवटी ह.भ.प.प्रा.अशोकजी चरडे महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी, श्रीच्या पालखीची प्रमुख मार्गाने भजनदिंडीसह भव्य मिरवणूक,त्यानंतर भव्य महाप्रसाचा हजारो भाविकांनी व नागरिकांनी आस्वाद घेतला. या ३ दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये