ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

546 कोटी थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करणे वसुली मोहीम जोरात

वसुलीसाठी मोठे अधिकारी मैदानात ;प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी यांची आढावा बैठक व फिल्डला भेट 

चांदा ब्लास्ट

     प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी, नागपूर विभाग यांनी चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत चंद्रपूर मंडळ व गडचिरोली मंडळ अंतर्गत सर्व कार्यकारी व उपकार्यकारी अभियंता यांच्या वसुलीचा आढावा घेतला. आणि लक्ष्य साध्य करण्याच्या सूचना केल्या. व फील्ड मध्ये प्रत्यक्ष भेट देत कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.

       महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना , कृषिपंप योजना ईत्यादिंची थकबाकी कोटी 541 लाख, झाली त्यामुळे घरघुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये व सार्वजनिक पाणिपुरवठा योजनेच्या थकबाकीदारां विरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी व मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

        चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन 13 कोटी12 लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन 3 कोटी 46 लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन 1कोटी 50 लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून 2 कोटी 69लाख तर, सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडूनg 4 कोटी 61 लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून 383 कोटी 51 लाख व पथदिव्यांची थकबाकी 132 कोटी 29 लाख झाली आहे. आहे.अशी एकूण 541 कोटी 77 लाख झाली तर चालू 2023-24 या वर्षातील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन 15 कोटी 56 लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन 4 कोटी येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन 1कोटी 60 लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून 2 कोटी 99 लाख तर, सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून 4 कोटी 50 लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून 123 कोटी 51 लाख व पथदिव्यांची थकबाकी 18 कोटी 86 लाख आहे.अशी एकूण 171कोटी 36 लाख झाली.

    त्यामुळे मार्च 24 पर्यंत चंद्रपूर परिमंडळातील 12 पेक्षा अधिक हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.

 श्री रंगारी यांनी चंद्रपूर व गडचिरोली मंडळ अंतर्गत काही बड्या ग्राहकांकडे भेट देत वसुली केली.

 चंद्रपूर मध्ये दोन हॉटेल्स आणि एका प्रतिष्ठित चित्रपट गृहाचा समावेश आहे.

हॉटेल्स -(रु.61940/-), (रु. 140000/-)आणि टॉकीज (रु. 46720,/-)असे एकूण 2लाख 48 हजार 666

 तर गडचिरोली मधील एका ग्राहकांकडून 7.1लाख दुसऱ्या ग्राहकांकडून लाख, 50 लाख असे एकूण 57.1लाख वसुल केले.

श्री.रंगारी यांनी वसुली मोहिमेच्या ठिकाणी चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही ठिकाणी कार्यरत लाईनमेण ची भेट घेत त्यांचे मनोबल वाढविले.

रूफ टॉप सोलरचा लाभ घेण्यासाठी मा.आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांची भेट श्री. रंगारी यांनी घेतली व कार्यालयीन इमारतीसाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक घरांसाठीही रुफ टॉप घेण्यासाठी प्रोत्साहित करावे अशी विनंती केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये