ताज्या घडामोडी

महाराजा ट्रॅव्हल्सचा भिषण अपघात – टँकरला दिली धडक

पालगाव येथुन नागपूरला जाताना जाम जवळ झालं अपघात - काही प्रवाशी जखमी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

पालगाव – राजुरा – बल्लारपूर – चंद्रपूर मार्गे नागपूरला जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील जाम जवळ भिषण अपघात झाला असुन ह्या अपघातात चालक वाहकासह 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी अवस्थेतील चालक, वाहक व प्रवाशांना नागपुर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येत असुन किरकोळ जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात प्राथमिक तपासणी व उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये