Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन दिवसात वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार ठार तर चार जख़मी

राष्ट्रीय महामार्गावर तीन तर सावली- सिंदोळा वळनदार मार्गावर एका घटनेचा सामावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

      राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात तीन जन ठार तर तीन जन जख्मी प्रमोद देवराव जयपुलकर ३३ वर्ष रा गडचिरोली,जयेश गोविंद महाड़ोले २२ वर्ष, चंद्रपूर, यश हरी सहारे १७ वर्ष मिंडाळा ता नागभीड असे मृतकाचे नाव आहे तर सै.प्रणाली प्रमोद जय पुलकर २३ वर्ष गडचिरोली,आकाश विनायक मोहूर्ले २२ वर्ष मिंडाळा,शेजल अमोल नापे २१ वर्ष किसान नगर, कुंमदेव पांडुरंग सहारे ३४ वर्ष रा. कोडेखल,दिशांत हर्षवर्धन बोरकर,२५ वर्ष रा.सावली असे जखमीचे नाव आहे मृतक प्रमोद जयपुलकर आणि त्याची पत्नी प्रनाली दोघे जन आपल्या एम एच 33 यू 3608 क्रमांकाच्या दुचाकिने बल्लारपुर येथून नवसाचा कार्यक्रम आटोपुन स्वगाव गडचिरोली येथे परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग चंद्रपूर गडचिरोली खेड़ी बिड़ी गोडाउन जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्रमोद जागिच ठार झाला तर पत्नी प्रणाली जखमी असून जखमी उपचारार्थ गडचिरोली सामान्य रुग्णालयत भर्ती करन्यात आले तर व्याहाळ येथील कार्यक्रम आटोपुन तीन मित्र आपल्या पल्सर एम एच 31 बि के 1167 या दुचाकीने गावकडे परत जात असताना भरधाव दुचकिने उभ्या ट्राली क्र एम एच 34 बि एफ़ 7038 ला जोरदार धडक दिल्याने जयेश महाडोले चंद्रपूर,यश सहारे मिंडाळा यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आकाश मोहुर्ले या जख्मी ला उपचारार्थ नागपुर येथे भर्ती करण्यात आले.

तसेच व्याहाळ येथील कार्यक्रम आटोपुन घरी किसान नगर येथे परत येताना रोड क्रॉस करताना बेलोरो क्र एम एच34 ए एम 7643 ने धडक दिल्याने शेजल नापे जख्मी झाली जख्मी ला उपचारार्थ गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले चिमूर येथील काही मित्र आपल्या बेलोरो गाडिने व्याहाळ येथील आयोजित गौतमी पाटिलच्या कार्यक्रमासाठी आले होते.

सदरच्या घटना गुरुवार रोजी रात्रि घडल्याने गुरुवार ठरला घातवार तर शुक्रवार रोजी दुपारी दोन वजताच्या दरम्यान सावली सिदोळा घोडेवाहि वळनदार मार्गावर भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने कुंमदेव सहारे कोंडेखल, दिशात बोरकर सावली गंभीर जख्मी झाल्याने कुंमदेव गडचिरोली तर दिशातला गडचिरोली वरुण नागपुर येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच दिशांत चा मृत्यु झाला दोघेही आपल्या कामनीमी त्या जात असताना एम 34 बि डी 2541,एम एच 34 ए टी 9032 क्रमानकाच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली त्यात ते दोघेही जख्मी झाले होते त्यामुळे वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार जन ठार तर चार जन जख्मी झाले पुढील तपास सुरु आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये