ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

सावली - मूल मार्गावरिल स्टार ढाबा नजिक घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली रेंज मधील उप क्षेत्र राजोली अंतर्गत मूल सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़केत १ महिन्यापूर्वी बिबटयाचा अज्ञात वाहनाच्या धड़कते मृत्यु झाला ही घटना ताजी असताना दोन दिवसापूर्वी रात्रि सावली – मूल मार्गावर पुन्हा एकदा ३ वर्षीय बिबटयाला आपला जीव गमवावा लागला ही चिंताजनक बाब असून जंगल सोडून वन्य जीव लोकवस्ती कडे अन्नाच्या शोधात येत असतील तर वन्य जीवांच्या संगोपन आणि सवरक्षणं याकडे व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे.

त्यामुळे वन्य हिंस्र जीवांची अन्नचि मात्रा वनात संपली की क़ाय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मानुस आणि वन्य जीव नैसर्गिक अन्न साखडीचा एक भाग असला तरी त्यातून नैसर्गिक समतोल साधल्या जाते सावली वनपरिक्षेत्र जंगल व्याप्त असून मोठ्या प्रमामात जंगल आहे त्यामुळे या रेंज अंतर्गत असलेल्या पाचही उप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन हिंस्र पशुचे वावर आहे त्यामुळे या रेंजमध्ये अनेक घटना नेहमी घडत असतात आता तर वन्य जीव लोकवस्ती कडे येण्याचा सपाटा सुरु झाल्याने तालुक्यात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

भयावह परिस्थितीत या भागातील शेतकऱ्याना शेती सांभाळण्याची वेळ निर्माण झाली आहे गावात राहणे, शेतात जाने कठिन होऊन बसले आहे ऐवढ़ी दहशत वन हिंस्र पशुचि निर्माण झाली असताना वनातील अन्नाच्या कमतरतेमुळे अन्नाच्या शोधात भटकत असलेला बिबट सावली उपक्षेत्रा अंतर्गत नियत क्षेत्र टेकाडी भागात फिरत असताना सावली – मूल मार्गावर स्टार ढाबा जवळ अज्ञात वाहनाच्या धड़केत ठार झाला घटनेची माहिती होताच सावली रेंजचे वनकर्मचारी धाऊन गेले.

मृत बिबटयाला ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी अंति मृत बिबटयाला टि. टी. सी. सेंटर चंद्रपुर येथे दफ़न करन्यात आले यावेळी सावली वनपरीक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी पि. जी. विरुटकर सावली उप क्षेत्राचे उपक्षेत्र सहा. आर. जी. कोडापे वनरक्षक बोनलवार, वनरक्षक चौ धरी व इतर वनकर्मचारी उपस्थित होते सावली वन परिक्षेत्रात वाघाचे हल्ले, वाघाची शिकार,अज्ञात वाहनाच्या धड़कते वाघांचा मृत्यु आदि घटना जोर धरु लागल्या असून वाघांचा मृत्यु एक चिंताजनक बाब असून वन्यहिंस्र जीव आणि मानुष आदिच्या सवरक्षणावर योग्य उपाय योजनेची गरज निर्माण होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये